Maoist Link Case: नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबा सह अन्य 4 आरोपींची जन्मठेप रद्द; नागपूर खंडपीठाचा निकाल

न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल देताना त्यांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याचा आरोप असलेल्या प्राध्यापक जी.एन. साईबाबा (GN Saibaba) यांना नागपूर खंडपीठाने (Nagpur bench of the Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. जी.एन. साईबाबा यांना गडचिरोली सत्र न्यायालयाकडून झालेली जन्मठेपेची शिक्षा नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. त्यांच्यासोबत इतर चार आरोपींची देखील कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जी एन साई बाबा सध्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये आहे. न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल देताना त्यांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोपींवर UAPA लावताना नियमानुसार कारवाई झाली नसल्याचं सांगत तसेच साई बाबा आणि इतर आरोपींच्या संबंधित ठिकाणावरुन पुरावे गोळा करताना नियम पालन झाले नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी एन साई बाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकले नाही. या आधारावर जी एन साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी यांची सुटका करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 ला नक्षलवादी कारवाईच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

त्यांनी या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. नागपूर खंडपीठात 7 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यांचा निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. आता या निकालावर सुनावणी करताना कोर्टाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

जी. एन. साईबाबा हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. 2013 मध्ये त्यांनी नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेट घेतल्याचं सआंगत पोलिसांनी अटकेची कारवाई केली. प्राध्यापक जी.एन. साईबाबांचा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांकडे असल्याचा त्यांचा दावा होता. गडचिरोलीमध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबांच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली यामध्ये डिजिटल पुरावे मिळाल्याचा त्यांचा दावा आहे.