IPL Auction 2025 Live

Bomb threat to RBI office in Mumbai: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालय सह 11 ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याच्या धमकीचा इमेल

पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

RBI (Photo Credits: PTI)

मुंबई मधील आरबीआयच्या कार्यालयामध्ये (RBI Office) बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेसेज आला आहे. आरबीआय सह HDFC आणि ICICI बॅंकेमध्येही बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या धमकीच्या मेलमुळे खळबळ पसरली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार खिलाफत इंडियाच्या ईमेलवरुन धमकी देण्यात आली आहे. ही धमकी आरबीआय च्या ईमेल आयडी वर आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास मुंबई मध्ये 11 ठिकाणी ब्लास्ट होतील अशी धमकी देण्यात आली होती.

दरम्यान धमकीच्या ईमेल मध्ये अन्यही काही मागण्यांचा उल्लेख आहे. देशाचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावे मोठा घोटाळा देशात होत आहे. त्यामुळे या दोघांच्या राजीनाम्याची देखील या इमेल मध्ये मागणी करण्यात आली आहे. Bomb Blast Threat Messages To Mumbai Police: मुंबई मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे ट्वीट; पोलिसांकडून तपास सुरू .

पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इमेलमधील माहितीनुसार मुंबईच्या विविध भागात तपासणी देखील करण्यात आली. मात्र यावेळी काहीही आक्षेपार्ह वस्तू पोलिसांना सापडलेली नाही.