Hoax Bomb Threats To Airlines: प्रसिद्धीसाठी पंतप्रधान कार्यालय आणि विमानांना 100 हून अधिक बॉम्बच्या धमक्या; नागपुरातील 35 वर्षीय व्यक्तीला अटक
कॉल आणि ईमेलद्वारे 100 हून अधिक फसव्या बॉम्बच्या धमक्या पाठवल्याप्रकरणी नागपूर येथील 35 वर्षीय लेखकाला अटक करण्यात आली आहे. जगदीश उईके असं या व्यक्तीचं नाव असून तो गोंदियाचा रहिवासी आहे. जगदीश उईके दिल्लीहून आल्यानंतर त्याला नागपुरात ताब्यात घेण्यात आले.
Hoax Bomb Threats To Airlines: एअरलाइन्स (Airlines), पंतप्रधान कार्यालय (Prime Minister's Office) आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांना कॉल आणि ईमेलद्वारे 100 हून अधिक फसव्या बॉम्बच्या धमक्या (Hoax Bomb Threats) पाठवल्याप्रकरणी नागपूर येथील 35 वर्षीय लेखकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. जगदीश उईके असं या व्यक्तीचं नाव असून तो गोंदियाचा रहिवासी आहे. जगदीश उईके दिल्लीहून आल्यानंतर त्याला नागपुरात ताब्यात घेण्यात आले.
नागपूरचे पोलिस डीसीपी लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उईके हा दहशतवादावर पुस्तक लिहिण्यासाठी ओळखला जातो. त्याचे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे, जो त्याने धमकीचे संदेश पाठवण्यासाठी वापरला जात होता. उईकेचा या फसव्या धमक्यांमागे दहशतवादाशी संबंधित नसून त्याऐवजी लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने केलेला एक प्रसिद्धी स्टंट असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -No-Fly List for Hoax Bomb Threats: विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांविरुद्ध केंद्र सरकार आक्रमक; नो-फ्लाय यादी सादर करण्यावर विचार)
आरोपीकडून भारतात 30 ठिकाणी बॉम्ब स्फोटाची धमकी -
जानेवारीपासून उईकेने कथितपणे असंख्य ईमेल पाठवले ज्यामध्ये बॉम्ब विविध ठिकाणी पेरण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान, त्याने संपूर्ण भारतात 30 ठिकाणी स्फोटाची धमकी दिली होती. त्याने ईमेलद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारख्या प्रमुख राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. (हेही वाचा -Fake Bomb Threats: 'बंगळुरू विमानतळावर प्रवाशाकडे सामानात बॉम्ब आहे', प्रियकराला मुंबईला जाणारे फ्लाइट पकडण्यापासून रोखण्यासाठी महिलेने केला फेक कॉल)
एअरलाइन्सला बॉम्बच्या धमक्या -
भारतातील सहा विमानतळ जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाच्या रडारवर असल्याचा दावा करत त्याच्या एका ईमेलने इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट आणि एअर इंडिया सारख्या एअरलाइन्सच्या 31 फ्लाइटचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या ईमेलनंतर सुरक्षा उपाय वाढवण्यात आले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)