BMC च्या शताब्दी रुग्णालयात PPE किट न देता तरुणाला स्वतःच्या COVID-19 आईचा मृतदेह उचलण्याची जबरदस्ती; दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
मुंबई (Mumbai) मधील कांदिवली (Kandivali) भागात असणाऱ्या शताब्दी रुग्णालयातील (Shatabdi Hospital) कर्मचाऱ्यांनी एका कोरोनामुळे (Coronavirus Deadbody) मृत महिलेच्या शरीराला कव्हर करण्याचे काम तिच्या मुलावर सोपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई (Mumbai) मधील कांदिवली (Kandivali) भागात असणाऱ्या शताब्दी रुग्णालयातील (Shatabdi Hospital) कर्मचाऱ्यांनी एका कोरोनामुळे (Coronavirus Deadbody) मृत महिलेच्या शरीराला कव्हर करण्याचे काम तिच्या मुलावर सोपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कुणाल उतेकर या संबंधित तरुणाने तक्रार नोंदवली असता सध्या संबंधित दोन कर्मचाऱयांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे. मात्र बीएमसी तर्फे चालवण्यात येणाऱ्या म्हणेजच सरकारी रुग्णालयात असा प्रकार घडणे लज्जास्पद आणि तितकेच गंभीर असल्याचे म्हणत कुणालने टीका केली आहे. नेमका हा प्रकार काय आहे याविषयी जाणून घ्या. Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; पहा तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?
बोरिवली मधील रहिवाशी कुणाल उतेकर याची आई पल्लवी उतेकर यांना 30 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते, यांनतर ताडीने त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना 2 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. याबाबत कुणालला हॉस्पिटल तर्फे कॉल करून कळवण्यात आले. कुणाल जेव्हा हॉस्पिटल मध्ये पोहचला त्यावेळेस त्यांना हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्याने त्याच्या मृत आईचे शरीर उचलून बॅग मध्ये भरण्यासाठी येण्यास सांगितले.
वास्तविक हे काम हॉस्पिटल प्रशासनाचे असले तरी, मृतदेह जड असल्याचे सांगत त्यांनी कुणालकडे मदत मागितली, यासाठी कुणालने आपल्या भावाला बोलावून घेतले. मात्र शरीर उचलण्यासाठी जायचे असताना हॉस्पिटलने कुणाल किंवा त्याच्या भावाला PPE किट सुद्धा दिला नाही. उलट विचारणा केल्यावर त्यांचे प्रश्न सुद्धा हॉस्पिटल कडून टाळण्यात आले.
याबाबत कुणालने मुंबई मिरर ला सांगितले की, " आईवरील प्रेमापोटी मी विना PPE किट कोरोना रुग्ण असंलेल्या वार्ड मध्ये गेलो होतो, तिथे आईचा मृतदेह भरण्यापासून ते बेडवरुन उचलून स्ट्रेटचार वर ठेवण्यापर्यंत मी सगळे काही केले. हे मी आईवरील प्रेमासाठी केले असले तरी हॉस्पिटल मधून मिळालेली वागणूक गैर आहे."
दरम्यान, याप्रकरणी कुणालने तक्रार केली असता आता संबंधित दोन कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. कुणालचे वडील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुणाल हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून तो सध्या बोरोवळी मधील गोखले कॉलेज मध्ये B. COM चे शिक्षण घेत आहे.