BMC Recruitment 2024: इंजिनियर्सना बीएमसी मध्ये सरकारी नोकरीची संधी; 16 डिसेंबर पर्यंत करा portal.mcgm.gov.in वर अर्ज

ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनियर ( मेकॅनिकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल), सेकंडरी इंजिनियर (सिव्हिल), सेकेंडरी इंजिनियर (मेकॅनिकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल) यासाठी बीएमसी मध्ये नोकरभरती होणार आहे.

Government Jobs | (File Photo)

Jobs For Engineers in BMC: सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांना बीएमसी (BMC) मध्ये आता नोकरीची संधी आहे. याबाबतचे नुकतेच एक नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. बीएमसीच्या जारी पत्रकामध्ये सुमारे 690 जागांवर नोकरभरती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनियर ( मेकॅनिकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल), सेकंडरी इंजिनियर (सिव्हिल), सेकेंडरी इंजिनियर (मेकॅनिकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रिकल) यासाठी नोकरभरती होणार आहे. यासाठी 26 नोव्हेंपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली असून 16 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. इंजिनियरिंग क्षेत्राच्या माध्यमातून विकासाला वेग देण्याच्या कामात योगदान देऊ इच्छिणार्‍यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

बीएमसी नोटिफिकेशन मध्ये 690 जागांवर ज्युनियर आणि डेप्युटी इंजिनियर पदांवर नोकरभरती होणार असल्याचं म्हटलं आहे. पदानुसार पात्रता निकष, पगार, अर्ज करण्याची प्रक्रिया वेगळी असल्याने बीएमसीचे अधिकृत परिपत्रक नीट वाचून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकाल. इथे वाचा बीएमसीचे सविस्तर परिपत्रक.

बीएमसी मध्ये नोकरीसाठी कसा कराल अर्ज?

इथे पहा अर्ज  करण्यासाठी डिरेक्ट लिंक  

दरम्यान अर्ज करताना उमेदवाराचे वय 18 वर्ष किमान आवश्यक आहे. तर वयामध्ये सूट मिळणार्‍या ती लागू असणार आहे. Deputy Engineer साठी पगाराचा बॅन्ड हा Level – M25 Rs.44,900 -1,42,400 असणार आहे तर Junior Engineer साठी पगाराचा बॅन्ड Level – M23 Rs.41,800 – 1,32,300 असणार आहे.