Mumbai Ganesha Idol Immersion: गणपती विसर्जनासाठी BMCची तयारी, शहरातील गणपती मूर्ती विसर्जन स्थळांची प्रभागनिहाय यादी जाहीर
प्रत्येक प्रभागात विशिष्ट विसर्जन बिंदूंचे वाटप करून विसर्जन प्रक्रिया सुलभ करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे हे BMC चे उद्दिष्ट आहे.
Mumbai Ganesha Idol Immersion: आज गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईकरांनी श्रीगणेशाचे जल्लोषात स्वागत केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गणपती विसर्जन मिरवणूक सुलभ करण्यासाठी प्रभागनिहाय नियुक्त विसर्जन स्थळांची विस्तृत यादी प्रसिद्ध केली आहे. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) उत्सवासाठी मुंबईचा उत्साह शिगेला पोहोचला असताना पर्यावरणपूरक विसर्जन प्रक्रिया सुनिश्चित करणे हे BMC साठी सर्वोच्च प्राधान्य आहे.
प्रत्येक प्रभागात विशिष्ट विसर्जन बिंदूंचे वाटप करून विसर्जन प्रक्रिया सुलभ करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे हे BMC चे उद्दिष्ट आहे. (हेही वाचा -Ganeshotsav 2023: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जीएसबी गणपती मंडळात पहिल्याच दिवशी 36 किलो चांदीचं दान)
प्रभागनिहाय विसर्जनाची ठिकाणे -
आज देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेश चतुर्थी, हा सण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो. या वर्षी 10 दिवसांचा उत्सव आज, 19 सप्टेंबरपासून सुरू होत असून 28 सप्टेंबरला संपणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक आपल्या आवडत्या गणेशाच्या उत्सवात व्यस्त आहेत.