BMC New Covid-19 Guidelines: मुंबईत एखाद्या इमारतीत 5 हून अधिक कोविड रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डींग सील होणार- आयुक्त इक्बाल चहल

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या नव्या नियमानुसार, आता गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक समारंभात बीएमसीची करडी नजर असणार आहे

BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: PTI and Twitter)

देशभरात कोरोनाचे लसीकरण युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या संख्येत (COVID-19 Cases) वाढ होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईसाठी नवी नियमावली (BMC New Guidelines) बनविली आहे. या नव्या नियमावलीनुसार, मुंबईत आता कोरोनाचे नियम खूप कडक होणार आहेत. ज्यामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार आहे. यात जर मुंबईत एखाद्या इमारतीत 5 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डिंग सील केली जाणार अशी माहिती मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल (BMC Commissioner Iqbal Chahal) यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या नव्या नियमानुसार, आता गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक समारंभात बीएमसीची करडी नजर असणार आहे.हेदेखील वाचा- अमरावती मध्ये 21 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लॉकडाऊन तर यवतमाळ मध्ये कडक निर्बंध लागू

मुंबई महानगरपालिकेच्या कोविड-19 च्या नव्या Guidelines

1. घरी विलगीकरण (Home Quarantine) कक्षात असलेल्या रुग्णांच्या हातामागे क्वारंटाईनचा शिक्का असणे बंधनकारक

2. फेस्क मास्कशिवाय लोकल गाड्यांमध्ये प्रवास करणा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी 300 मार्शल भाड्याने घेतले जाणार आहे.

3. मुंबईत नियमांचे उल्लंघन करणा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त मार्शल नियुक्त केले जातील.

4. इमारतीत 5 किंवा त्याहून अधिक कोविड रुग्ण आढळल्यास संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल.

5. लग्नाचे हॉल, क्लब आणि रेस्टॉरन्ट्स इ. ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात आहे की नाही यासाठी पोलिसांकडून छापे टाकले जातील.

6. ब्राझील वरुन मुंबईत आलेल्यांनी संस्थात्मक क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.

7. ज्या भागात जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी कोरोना चाचण्या वाढविल्या जातील.

थोडक्यात मुंबईत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील कोरोनाचे नियम आणखीनच कडक होणार आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन इक्बाल चहल यांनी केले आहे.