BMC Election 2021: उद्धव ठाकरे आपडा! बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज; मुंबई येथे आज गुजराती मेळाव्याचे आयोजन

पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणुका पार पडत आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी साधारण नोव्हेंबर, डिसेंबर 2020 पासूनच रणशिंग फुंकले. त्यासाठी आमदार अतुल भातकळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील केली. त्यानंतर मग शिवसेनाही सतर्क झाली. शिवसेनेनेही आपला संपर्क कार्यक्रम जोरदार केला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुंबई (Mumbai) म्हणजे शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला. मुंबई महापालिका निवडणूक 2022 (BMC Election 2021) मध्ये हाच बालेकिल्ला खेचून घेण्यासाठी शिवसेनेचा एकेकाळचा मित्र भाजप (BJP) जोरदार कार्यरत झाला आहे. भाजपचा एकूण नूर पाहून शिवसेनाही जोरदार कार्यरत झाली आहे. त्यामुळे मुंबई येथे अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये शिवसेनेचा गुजराती मेळावा (Gujarati Melava) आज (10 जानेवारी 2021) पार पडतो आहे. या मेळाव्यात शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांच्या उपस्थितीत 11 गुजराती उद्योगज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. तसेच, या मेळाव्यास सुमारे 100 उद्योगपती उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबई शहरात गुजराती मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेनेने गुजराती मेळाव्याचे आयोजन केले आहे. गुजराती मतदार आणि नागरिकांचे मन वळविण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईनही शिवसेनेने दिली आहे. आता ही टॅगलाईन शिवसेनेला किती फायदेशीर ठरते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याशिवाय महाविकासआघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निवडणुकीला कसे सामोरे जातात हेही पाहावे लागणार आहे. (हेही वाचा,  BMC Elections 2022: ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद)

मुंबई महापालिका निवडणुकीस अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणुका पार पडत आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी साधारण नोव्हेंबर, डिसेंबर 2020 पासूनच रणशिंग फुंकले. त्यासाठी आमदार अतुल भातकळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील केली. त्यानंतर मग शिवसेनाही सतर्क झाली. शिवसेनेनेही आपला संपर्क कार्यक्रम जोरदार केला आहे.

एकूण 227 जागांसाठी मुंबई महापालिका निवडणूक 2021 मध्ये पार पडते आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना वरुद्ध भाजप असाच सामना रंगणार असे दिसते. परंतू, यासोबतच काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष कशी कामगिरी करणार यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif