Mumbai COVID-19 Death Cases: मुंबईत कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी मृत्यूदर पाहून BMC आयुक्तांनी कोविड योद्धांसह जनतेचे केले अभिनंदन

महाराष्ट्र सरकार व बीएमसीच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. सहकार्य आणि सहकार्याबद्दल मी मुंबईकरांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले आहेत.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

मुंबईत मार्च 2020 पासून सुरु असलेल्या कोरोना विरुद्ध चे युद्ध आज काही अंशी फळाला आल्याचे चित्र एकूण आकडेवारीवारून पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 3 रुग्ण (COVID-19 Death Cases in Mumbai) दगावल्याची माहिती मिळत आहे. हा मृत्यूदर आतापर्यंतचा सर्वात कमी मृत्यूदर आहे. हे दिलासादायक स्थिती पाहून मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व कोविड योद्धांचे आणि जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र सरकार व बीएमसीच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. सहकार्य आणि सहकार्याबद्दल मी मुंबईकरांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले आहेत.

सर्व डॉक्टर आणि आघाडीच्या कामगारांना तसेच सकारात्मक जनजागृती करणार्‍या माध्यमांना मोठा सलाम असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुंबईने कोरोना विरुद्ध चांगली लढाई लढली असून आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे हा एकच ध्यास मुंबईतील जनतेसमोर आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.हेदेखील वाचा- Pune Schools Reopens: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 वी ते 12 वी चे वर्ग 4 जानेवारी पासून पुन्हा सुरु होणार

मुंबईत आज 581 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 95 हजार 240 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,135 वर पोहोचली आहे. तसेच आज 697 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2,75,464 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला मुंबईत 7771 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजची ही आकडेवारी पाहता मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93% इतका झाला आहे. तर कोविड रुग्ण वाढीचा दर 0.21% इतका झाला आहे. तसेच 2 जानेवारीपर्यंत मुंबईत एकूण 23,93,590 कोरोना चाचण्या झाल्या आहेत.