Defaulter Bungalow Of Minister's In Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्याचे बंगले डिफॉल्टर यादीत, पाणीपट्टीही थकली

अशा वेळी तब्बल 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी शिल्लख असताना मुंबई महापालिका सदर मंत्र्यांवर अथवा राज्य सरकारवर इतकी का मेहरबान आहे, असा सवाल उपस्थत होत आहे.

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Defaulter List Of Minister's Bungalow: कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन काळात आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 90 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप होतो आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या या आरोपात म्हटले आहे की, राज्यासमोर आर्थिक अडचणी आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. असे असताना मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती करण्यासाठी पैसा कसा आला? अशा प्रकारे खर्च करणे आवश्यक आहे का? असे प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि इतर अनेक मंत्र्यांच्या बंगल्यातील पाणीपट्टी थकीत राहिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका (BMC) या मंत्र्यांच्या बंगल्यांचा पाणीपुरवाठा तोडणार का? याबाबत उत्सुकता आहे. आरटीआय (RTI) कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागवलेल्या माहितीत हा प्रकार पुढे आला आहे.

पाणीपट्टी थकबादीकादर मंत्र्यांचे बंगले (नावांसह)

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वर्षा बंगला)
  2. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा)
  3. वित्तमंत्री अजित पवार (देवगिरी)
  4. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर)
  5. जयंत पाटील (सेवासदन)
  6. नितीन राउत, उर्जा मंत्री (पर्णकुटी)
  7. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन)
  8. अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई
  9. उद्योगमंत्री (पुरातन)
  10. दिलीप वळसे पाटील (शिवगिरी)
  11. सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन)
  12. राजेश टोपे (जेतवन)
  13. नाना पाटोले, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट)
  14. राजेंद्र शिंगे (सातपुडा)
  15. नवाब मलिक (मुक्तागीरी)
  16. छगन भुजबळ (रामटेक)
  17. रामराजा निंबाळकर विधानभवन सभापती (अजंठा)
  18. सह्याद्री अतिथीगृहचे

(हेही वाचा, विक्रोळी-कांजूरमार्ग परिसरात घरासाठी फुकट जागा मिळत असल्याची पसरली अफवा आणि मग जे झाले ते ऐकून तुम्हीही माराल डोक्यावर हात)

मंत्र्यांची पाणीपट्टी थकबाकी आकडेवारी

  1. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री- वर्षा- एकूण थकबाकी 24916/-
  2. अजित पवार, अर्थमंत्री- देवगिरी-एकूण थकबाकी 84224/-
  3. देवेंद्र फडणवीस-सागर-एकूण थकबाकी-111550/-
  4. जयंत पाटील- सेवासदन- एकूण थकबाकी-115288/-
  5. नितीन राउत, उर्जा मंत्री-पर्णकुटी-एकूण थकबाकी-115288/-
  6. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, -रॉयलस्टोन-एकूण थकबाकी-12809/-
  7. अशोक चव्हाण-मेघदूत-एकूण थकबाकी-111005/-
  8. सुभाष देसाई, उद्योगमंत्री-पुरातन-एकूण थकबाकी-50120/-
  9. दिलीप वळसे पाटील- शिवगिरी- एकूण थकबाकी-5756/-
  10. एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)-नंदनवन-एकूण थकबाकी-119524/-
  11. राजेश टोपे,-जेतवन- एकूण थकबाकी-6703/-
  12. नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष, -चित्रकुट-एकूण थकबाकी-83514/-
  13. राजेंद्र शिंगे, सातपुडा-एकूण थकबाकी- 23746/-
  14. नवाब मलिक, मुक्तागीरी- एकूण थकबाकी-30102/-
  15. छगनराव भुजबळ- रामटेक-एकूण थकबाकी-39939/-
  16. रामराजा निंबाळकर, विधान सभापती-अजंठा-एकूण थकबाकी-128797/-
  17. सह्याद्री अतिथीगृह- एकूण थकबाकी-640523/-

सर्वासाधारणपणे दोन किंवा तीन महिन्यांची पाणीपट्टी थकीत राहिली की मुंबई महापालिका लगेचच सर्वसामान्य मुंबईकराचा जलपुरवठा खंडीत करते. अशा वेळी तब्बल 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी शिल्लख असताना मुंबई महापालिका सदर मंत्र्यांवर अथवा राज्य सरकारवर इतकी का मेहरबान आहे, असा सवाल उपस्थत होत आहे. दरम्यान, पालिकेने या सर्व मंत्र्यांचे बंगले डिफॉल्टर यादीत टाकले आहेत.