Jumbo COVID Centre Scam: कथित जम्बो कोविड सेंटर प्रकरणी आज Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात राहणार हजर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे
कोरोना संकटकाळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या स्तरावर क्वारंटाईन सेंटर्स आणि कोविड सेंटर्स उभारण्यात आली होती. पण या उभारणीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडी कडून तपास सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणामध्ये मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आज (16 जानेवारी) दिवशी चहल यांना मुंबईतील ईडी कार्यालयात (Mumbai ED Office) हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान काल मीडीयाशी बोलताना चहल यांनी आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही म्हटलं आहे. ईडीने चहल यांना कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचा आदेश नोटीसीमधून दिला आहे. नक्की वाचा: ED Summons Iqbal Singh Chahal: इक्बालसिंह चहल यांना ईडीची नोटीस; 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पाठवले समन्स.
आझाद मैदान पोलिस स्टेशन मध्ये किरीट सौमय्यांनी तक्रार दाखल केली आहे. सोबतच तक्रारीत संजय राऊतांचे निकटावर्तीय सुजीत पाटकर यांच्या देखील नावाचा समावेश आहे. काही बेनामी कंपन्यांना कंत्राट देऊन चहल यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.
इकबाल सिंह चहल हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि आता प्रशासक म्हणूनही कारभार सांभाळत आहेत. ठाकरे सरकारच्या काळात त्यांची पालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. प्रविण परदेशी यांची उचलबांगडी करून त्यांची नेमणूक झाली होती.