Photo Credits : Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बुधवारी (9 जानेवारी) सोलापूरात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी इंदिरा गांधी स्टेडिअम येथे आयोजित केलेल्या सभेला जाताना ताफ्याला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन मोदींना काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मेदम मारहाण केली. तर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नरेंद्र मोदींनी सोलापूरात इंदिरा गांधी स्टेडिअमवर आयोजित केलेल्या सभेला जाताना एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच मोदींना काळे झेंडे दाखवत त्यांच्या सभेला विरोध केला गेला. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.(हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, सोलापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करणार; जाणून घ्या कार्यक्रम)

सोलापूरात कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारने राज्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण केल्याची टीका केली आहे. (हेही वाचा-काँग्रेसच्या व्होटबँक राजकारणामुळे विकासात अडथळा, सोलापूर येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्ला)