भाजप महिला पदाधिकाऱ्याची इस्त्रीचे चटके देऊन नालासोपाऱ्यात हत्या

त्यांना एक १० वर्षांचा मुलगाही आहे. तो आजोबांकडे राहतो. मुळच्या पुण्याच्या असलेल्या रुपाली या दोन वर्षांपूर्वी नालासोपारा येथे राहण्यास आल्या होत्या.

भाजप महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (छायाचित्र सौजन्य: सोशल मीडिया)

भाजप महिला पदाधिकाऱ्याची नालासोपाऱ्यात गुढरित्या हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुपाली चव्हाण (वय ३२ वर्षे) असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. रुपाली चव्हाण या वसई-विरार भाजपच्या जिल्हा युवती सहप्रमुख होत्या. दरम्यान, आगोदर इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक देऊन त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या फोन स्वीकारत नसल्यामुळे त्यांच्या वडीलांना संशय आला. त्यामुळे त्यांनी एका परिचितास त्यांनी रुपाली यांच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचा प्रकार समजला.

रुपाली चव्हाण यांची हत्या दोन दिवसांपूर्वीच झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान प्राप्त माहितिनुसार, रुपाली चव्हाण या घटस्फोटित होत्या. त्यांना एक १० वर्षांचा मुलगाही आहे. तो आजोबांकडे राहतो. मुळच्या पुण्याच्या असलेल्या रुपाली या दोन वर्षांपूर्वी नालासोपारा येथे राहण्यास आल्या होत्या. राजकारणाची आवड असल्याने त्या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. सध्या त्या भाजपच्या जिल्हा युवती सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

दरम्यान, चव्हाण यांनी नालासोपारा येथे एक दुकान घेतले होते. या दुकानात त्या पादत्राणे विक्रिचा व्यवसाय सुरु करणार होत्या. या दुकानाचे आज उद्घाटन होते. रुपाली यांचे वडीलही याच परिसरात काही अंतरावर राहतात. दुकानाच्या उद्घाटनासंदर्भातच त्यांनी रुपाली यांना मोबाईलवरुन फोन केला. मात्र, बऱ्याचदा फोन करुनही त्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यामुळे संशय आल्याने वडीलांनी रुपाली यांच्या घरी जाऊन पाहण्यास एका परिचितास सांगितले. परिचित रुपाली यांच्या घरी गेला असता त्यांची हत्या झाल्याचा प्रकार पुढे आला.

पोलिसांनी पाहणी केली असता रुपाली यांचा मृदतेह कुजलेल्या आवस्थेत आढळून आला. तसेच, त्यांच्या शरीरावर वार, इस्त्रिचे चटके आणि विजेचा शॉक दिल्याच्या खुणा आढळल्या. मृतदेहाची स्थिती पाहता त्यांची हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Credit Card Online Spending Surges: सण-उत्सव काळात क्रेडिट कार्डचा ऑनलाइन वापर वाढला, एकूण व्यवहारांपैकी 65% व्यवहार ई-कॉमर्सद्वारे

CM Eknath Shinde On Onion Price: कांद्याच्या वाढत्या किमतीवर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली चिंता; साठेबाजी करणाऱ्यांवर दिले कडक कारवाईचे निर्देश

Maharashtra Weather Forecast: राज्यात चक्रीवादळाचा प्रभाव! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत