IPL Auction 2025 Live

BJP On Begger: मुंबईतील रस्ते भिकारीमुक्त करण्याची भाजपची बीएमसीकडे मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात पावले उचलावीत, अशी भूमिका पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांनी मांडली.

Begger (Pic Credit - )

मुंबईतील रस्ते भिकारीमुक्त (Begger) करण्याची मागणी भारतीय जनता (BJP) पक्षाने केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात पावले उचलावीत, अशी भूमिका पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांनी मांडली. BMC ने कांदिवलीमध्ये बेघरांसाठी निवारा उघडला आहे. मात्र, फार कमी लोक सुविधा वापरताना दिसतात. शहरात अनेक भिकारी फिरत आहेत. बीएमसीने त्यांना कांदिवली (Kandivali) सुविधेत हलवले पाहिजे आणि भिकाऱ्यांच्या सुधारणेसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, यादव म्हणाले. हेही वाचा Devendra Fadnavis On Nawab Malik: नवाब मलिकच्या अटकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये

स्थायी समितीमध्ये बीएमसीच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेदरम्यान यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याआधी, बीएमसीने 2020 मध्ये मुंबईतील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मुंबईत 29,000 भिकारी असल्याचे समोर आले होते.