BJP Workers Protest: भाजपच्या कार्यकर्त्यांचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत आंदोलन
डोंबिवली स्थानकात फूट ओव्हर ब्रिजखाली कचऱ्याचे ढीग साचले असून त्याची कोणालाच काळजी वाटत नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) हद्दीत गुरुवारी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी जुळ्या शहरांमध्ये आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे स्थानिक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत आंदोलन (Agitation) केले आहे. शहरातील विविध भागांतून हजारो आंदोलक (Agitator) जमले आणि निषेधार्थ नागरी कार्यालयाकडे पायी चालले. त्यांनी डोंबिवलीतील काही भागांमध्ये अस्वच्छता आणि खराब पाणीपुरवठ्या विरोधात आवाज उठवला. हेही वाचा Sameer Wankhede Case: नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर 22 नोव्हेंबरला होणार सुनावणी
केडीएमसीतील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, कल्याण आणि डोंबिवली या जुळ्या शहरांबद्दलच्या निष्काळजी वृत्तीमुळे एमव्हीएचे उद्दिष्ट आता मिशन डोंबिवली नसून कमिशन डोंबिवली आहे असे दिसते. डोंबिवली स्थानकात फूट ओव्हर ब्रिजखाली कचऱ्याचे ढीग साचले असून त्याची कोणालाच काळजी वाटत नाही.