पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्याची खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी
राजधानी एक्सप्रेस पुण्यातूनही जोडली पाहिजे, दिल्ली ते हैदराबाद एक्सप्रेस असो किंवा बेंगळुरू ते दिल्ली एक्सप्रेस असो, ती पुण्यातूनच गेली पाहिजे. अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (BJP MP Medha Kulkarni) यांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या नावामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवा अर्थात बाजीराव प्रथम यांच्या नावाने ओळखले जावे अशी मागणी केली आहे. 1720 ते 1740 दरम्यान छत्रपती शाहू प्रथम यांच्या कडे ते पहिले पेशवा होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी बाजीराव प्रथम यांची मोलाची कामगिरी आहे. त्यांच्या कारकीर्दीमध्ये कधीही ते लढाई हरलेले नाहीत.
नुकतीच पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागांची बैठक बोलावण्यात आली होती. पुणे रेल्वे स्थानकाला थोरेले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी अनेक संघटनांची मागणी केली असल्याने मी आज ही मागणी पुन्हा मांडल्याचं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. "पुण्याच्या गौरवशाली इतिहासाची लोकांना माहिती व्हावी हा यामागचा उद्देश आहे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक केंद्र आहे आणि आयटी उद्योगासाठी ओळखले जाते, परंतु इतिहासाचे ठसे देखील प्रतिबिंबित होणे महत्वाचे आहे," असे त्या पुढे म्हणाल्या. नक्की वाचा: Shravan Special Jyotirlinga Air Tour Packages: मुंबई आणि पुण्याहून IRCTC चे श्रावण स्पेशल ज्योतिर्लिंग हवाई टूर पॅकेजेस; जाणून घ्या ठिकाणे, दर व इतर माहिती.
खासदार मेधा कुलकर्णी यांची माहिती
#WATCH | Pune, Maharashtra: BJP MP Medha Kulkarni demands renaming the Pune station. She says, "There are a few demands regarding the Pune railway station... Pune is considered the educational and IT hub. Despite being a city of such importance, the current situation of the… pic.twitter.com/FvYpNBcyTb
— ANI (@ANI) June 24, 2025
नाशिक आणि बदलापूर सारख्या प्रमुख शहरांना जोडणारी व्यवस्था देखील नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. राजधानी एक्सप्रेस पुण्यातूनही जोडली पाहिजे, दिल्ली ते हैदराबाद एक्सप्रेस असो किंवा बेंगळुरू ते दिल्ली एक्सप्रेस असो, ती पुण्यातूनच गेली पाहिजे. अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

