महाराष्ट्र: वाढीव वीज बिलवाढीविरोधात आज भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, मनसेकडून दादर मध्ये पोस्टर लावून आक्रमक आंदोलनाचे संकेत
राज्यातील सरकारने वीज बिलवाढीचा चालवलेला अनागोंदी कारभार पाहता आज भाजपच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलन होत आहे.
राज्यात लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान महावितरणाने सामान्य नागरिकांना वीज बिलवाढीचा (Electricity Bill) जोरदार शॉक दिला. यामुळे सामान्य जनता पुरती हवालदिल झाली असून त्यांनी वीज बिल माफ करण्यासंबंधी राजकीय नेत्यांकडे आपले गा-हाणे मांडले. राज्यातील सरकारने वीज बिलवाढीचा चालवलेला अनागोंदी कारभार पाहता आज भाजपच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलन होत आहे. यात भाजप नेते (BJP Leaders) काही ठिकाणी वीजबिलांची होळी करणार आहेत. तर दुसरीकडे मनसेने (MNS) देखील आक्रमक भूमिका देत सरकारला आजपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तसे न झाल्यास येत्या 26 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी आज त्यांनी दादरमध्ये पोस्टर लावून आक्रमक आंदोलनाचे संकेत देखील सरकारला दिले आहेत.
वाढीव बिल वाढीच्या मुद्द्यावर आज मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अन्य जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज 2,000 वीजबिलांची होळी करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नागपूरात भाजप कार्यकर्त्यांकडून वीजबिलाची होळी करण्यात आली आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.हेदेखील वाचा- येत्या 1 डिसेंबरपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित होणार 'हे' महत्त्वाचे बदल, रेल्वेतही होणार मोठा बदल
तर दुसरीकडे मनसेने राज्य सरकारला वीज बिलवाढीविरोधात योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आजचा शेवटचा दिवस दिला आहे. तसे न झाल्यास येत्या 26 नोव्हेंबर ला मनसे स्टाईलने राज्यभरात आंदोलन करणार आहेत. त्याची एक झलक म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर परिसरात पोस्टर्स लावून आक्रमक आंदोलनाचे संकेत दिले आहेत. "वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल असं सरकारनेच जाहीर केलं होतं. परंतु दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा," असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.