Mumbai News: मुंबईत सोन्याच्या तस्करीची मोठी कारवाई, 2 आरोपी ताब्यात

सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री केली जात आहे अशी माहिती डीआरआयला गुप्तचर विभागाच्या हाती मिळाली.

Gold | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Mumbai News: मुंबईत सोन्याची तस्करीची मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री केली जात आहे अशी माहिती  डीआरआयला गुप्तचर विभागाच्या हाती मिळाली. 5 मार्चपासून महसूल गुप्तवार्ता संचालनायाने तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना परदेशी बनावटीच्या विटांच्या स्वरुपातील 10.7 किलो सोने, तसेच सोने, तस्करीची विक्री  व्यवहारांतून मिळवलेली 1.8 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आणि त्यांनी ती ताब्यात घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तवार्ता संचालकाकडे गुप्त माहिती मिळाली की, मुंबईत सोन्याची तस्करी होत आहे. DRI ने छाप टाकल्यानंतर दोन जणांना अटक केले. या पैकी एक जण ही टोळी चालवत असल्याचे निदर्शनास येतात त्याच्या घऱी टाकलेल्या धाडीत तस्करी करून आणलेले ३.७७ किलो सोने ताब्यात घेतले. महसूल गुप्तचर विभागाने संशयिताच्या घरी धाड टाकली तेव्हा आरोपीने १४ मजल्यावरून संशयास्पद वस्तू फेकले होते. मग त्यापरिसरतून ६० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

६ मार्च रोजी आरोपींच्या घरी छापा टाकला आणि सोन्याची तस्करीचा पदार्फास केला. विभागाने चौकशीतून ३ मोबाईल फोन, प्रत्येकी १ किलो वजनाच्या २ सोन्याच्या विटा ताब्यात घेतले. एका आरोपीने त्याचा फोन आणि परदेशी बनावटीच्या सोन्याचा दोन विटा फेकून दिल्या. सुमारे १५ तासांची शोधमोहिम आणि पाठपूरावा केला होता. आणखी  २५ लाख रोकड देखील ताब्यात घेतले अशी माहिती पोलिसांनी दिली.