Vitthal Rukmini Live Darshan: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंढरीच्या विठुरायाचं थेट दर्शन आजपासून सुरु
आज सकाळी सहापासून विठ्ठल भक्तांनी आपले मस्तक थेट विठुरायाच्या चरणावर ठेवले आणि पांडूरंगाचे दर्शन घेतले.
Vitthal Rukmini Live Darshan: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठूरायाच्या भक्तांना अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आहे. कोरोनामुळे गेल्या काही काळापासून बंद असलेलं विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचं थेट दर्शन आजपासून सुरु होत आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भक्तांमधील आणि वारकऱ्यांमधील अंतर कमी होणार आहे. विठूरायाच्या भक्तांना आता थेट पंढरीच्या पांडूरंगाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त्त विठ्ठल मंदिरात खास फळे आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज गुढी पाडवा अर्थात मराठी नविन वर्षा निमित्त श्री. विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात गुलाब, झेंडू, शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे. (हेही वाचा -Gudi Padwa 2022 Wishes: BMCकडून जनतेला दिल्या गुडीपाडव्याच्या शुभेच्छा)
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विठुरायाचे थेट दर्शन आजपासून सुरू करण्यात आले आहे. आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठुरायाच्या चरणावर दर्शन घेणाऱ्या पहिल्या भाविकांच्या अंगावर पुष्पवृष्टी करीत स्वागत केलं.
आज सकाळी सहापासून विठ्ठल भक्तांनी आपले मस्तक थेट विठुरायाच्या चरणावर ठेवले आणि पांडूरंगाचे दर्शन घेतले. आजपासून निर्बंध बंद झाल्याने आता मंदिरात देवाला प्रिय असणारा तुळशी हार आणि प्रसाद नेता येणार आहे. त्यामुळे शेकडो लहान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.