Trupti Desai in Ahmednagar Police Custody: भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना अहमदनगर पोलिसांनी सुपे टोलनाका येथून ताब्यात घेतले

या वेळी बोलताना तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, आज मानव हक्क दिन आहे.किमान आजच्या दिवशी तरी मानवी हक्कांपासून कोणही कोणाला रोखू नये.

Trupti Desa | (Photo Credits-Facebook)

भूमाता ब्रिगेडच्या (Bhumata Brigade० नेत्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई या अहमनदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथे साईबाबा मंदिर (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi) परिसरात ड्रेसकोडबाबत लावण्यात आलेला बोर्ड हटविण्यासाठी पुणे येथून निघाल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी तृप्ती देसाई यांना शिर्डीपासून शेकडो किलोमटीर दूर असलेल्या सुपे टोल नाका (Supa Toll Plaza) येथून ताब्यात घेतले आहे.

तृप्ती देसाई यांना ब्राह्मण महासंघाने आगोदरच तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे दोन्ही संघटना एकमेकांसमोर आल्यास कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस सकाळपासूनच कार्यरत होते. दरम्यान, पोलिसांनी ब्राह्मण महासंघाचे अनिल दवे आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीमध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले होते. (हेदेखील वाचा- Shirdi: तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेश करण्यास बंदी; छोट्या कपड्यांबाबतचा वाद शिगेला )

तृप्ती देसाई यांना ताब्यात घेत असताना कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या वेळी बोलताना तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, आज मानव हक्क दिन आहे.किमान आजच्या दिवशी तरी मानवी हक्कांपासून कोणही कोणाला रोखू नये. माझ्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर मी शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात जाणार नाही. आमच्या कार्यकर्ता महिला त्या ठिकाणी जातील आणि तो बोर्ड हटवून येतील.