देवेंद्र फडणवीस यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी; कपिल पाटील आयोजित खासदार चषक 2020 मध्ये ठोकले षटकार (Watch Video)

भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार चषक 2020 या स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी भेट देत कपिल पाटील हे गोलंदाजी करत असताना थेट षटकार लावून आपले कौशल्य दाखवून दिले

Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांना आजवर आपण राजकीय वर्तुळात विरोधकांवर टोलेबाजी करताना पहिले असेल मात्र काल भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक 2020 (Khasdar Chashak 2020) मध्ये फडणवीस यांनी मैदानात केलेली फटकेबाजी हा कौतुकाचा विषय ठरत आहे. भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील (Kapil Patil)  यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार चषक 2020 या स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये फडणवीस यांनी भेट दिली होती यावेळी कपिल पाटील हे गोलंदाजी करत असताना फडणवीस यांनी थेट षटकार लावून आपले कौशल्य दाखवून दिले. फडणवीस बॅटिंग करत असतानाचा एका व्हिडीओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

डोंबिवली: नमो रमो ट्रॉफी 2020 स्पर्धेच्या पोस्टरवरील मजकूरानंतर वाद; क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलली

प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी "जनतेचा आणि जनमत लाभलेला नेता म्हणजे कपिल पाटील. युवकांना लाजवेल अशी त्यांची कार्य तत्परता आहे. एखाद्या गोष्टीचं भव्य आयोजन कसे करावे ते पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मात्र तरीही कामांचे श्रेय घेण्यासाठी ते चढाओढ करत नाहीत" अशा शब्दात कपिल पाटील यांचे कौतुक केले. तर याच वेळी महाविकासाआघाडीला सुद्धा टोलावत "आमच्या विकास रेषेपेक्षा मोठी रेष मारा, मात्र आमची रेष मिटवू नका नाहीतर जनता तुम्हाला मिटवेल. विकास कुणीही थांबवू शकत नाही ” असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस बॅटिंग व्हिडीओ

दरम्यान, फडणवीस यांचा हा बॅटिंग करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट होत आहे, केवळ राजकारणातच नाही तर मैदानात सुद्धा माजी मुख्यमंत्रीच मातबर आहेत अशा प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif