BEST Strike: मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडले

या संपावर वेळीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दाने घेतली आहे. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे.

BEST Strike | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

BEST Strike: शिवसेना (Shiv Sena) कोस्टल रोडला (BEST Strike) पैसे देते तर, बेस्टला का नाही? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोस्टल रोडला विरोध दर्शवला आहे. वरळी येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडल्याचे वृत्त आहे. बेस्ट कर्मचारी सध्या संपावर आहेत. बेस्ट संपाचा आज (सोमवार, 14 जानेवारी) सातवा दिवस आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचारी संपावर लवकरात लवकर तोडगा काढा, अन्यथा आम्ही तमाशा करु असा इशारा मनसेने यापार्वी दिला होता.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

(हेही वाचा, ओला- उबेर चालक संपावर जाणार? प्रवाशांचे पुन्हा होणार नाहक हाल)

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेसुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांची काही वेळात भेट घेणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, सातव्या दिवशी तरी बेस्टचा संप मिटेल आणि मुंबईकर प्रवाशांची कोंडीतून मुक्तता होईल, अशी आशा आहे. या संपावर वेळीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दाने घेतली आहे. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे. तर, बेस्टचा संप म्हणजे आपल्याला कमाई करण्याची संधी असे सूत्र मानत काही रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. यात टॅक्सीवाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांची अधिकच कोंडी होत आहे. सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना त्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे.