BEST Strike: मुंबईकरांना दिलासा, तिढा सुटला बेस्ट कर्मचारी संप मागे
बेस्ट कृती समिती आणि कामगार संघटनांची बैठक झाल्यावर थोड्याच वेळात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कामगार नेते आणि कर्मचारी यांच्यात वडाळा येथे ही बैठक पार पडणार आहे.
BEST Strike: गेले 9 दिवस रखडलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला. वाहतूक कर्मचारी, बेस्ट प्रशासन यांच्यात विविध मागण्यांवरुन संघर्ष सुरु होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयात (MUmbai High Court) झालेल्या सुनावणीत आदेश दिल्यानंतर कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घेतला. या वेळी 10 टप्प्यांऐवजी 15 टप्प्यांनी वेतनवाढ करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. तर, संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली.
न्यायालयात सुनावणी वेळी आपल्या अनेक मागण्या कर्मचाऱ्यांनी लाऊन धरल्या. यातील काही मागण्यांना सरकारने सकारात्मकता दर्शवली. तर, काही मुद्द्यांवर कामराग संघटनाही एक पाऊल मागे आल्या. या वेळी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटना आणि प्रशासन यांच्यात एक समिती नेमूण विविध मुद्द्यांवर चर्चा करावी. ही चर्चा निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली करावी असे निर्देशही न्यायालयाने प्रशासनाला दिले. (हेही वाचा, BEST Strike: एक तासाच्या आत संप मागे घ्या,बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश)
दरम्यान, न्यायालयाने आदेश दिला असला तरी, कामगार संघटनांनी अद्याप संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली नाही. बेस्ट कृती समिती आणि कामगार संघटनांची बैठक झाल्यावर थोड्याच वेळात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कामगार नेते आणि कर्मचारी यांच्यात वडाळा येथे ही बैठक पार पडणार आहे.