BEST Bus On Coastal Road: बेस्ट कडून कोस्टल रोड वर एनसीपीए ते भायखळा स्टेशन नवी एसी बससेवा सुरू; पहा मार्ग, तिकीट दर

A78 ही एसी बस एनसीपीए (NCPA) ते भायखळा स्टेशन (Byculla Station) दरम्यान धावणार आहे.

BEST Bus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हाजी अली (Haji Ali) ते वरळी (Worli) दरम्यान कोस्टल रोड सुरू केल्यानंतर आता बेस्ट (BEST Bus) कडून या मार्गावर बेस्टची फेरी सुरू केली आहे. नव्या एसी बसने प्रवासी या मार्गावर फिरू शकणार आहे. A78 ही एसी बस एनसीपीए (NCPA) ते भायखळा स्टेशन (Byculla Station) दरम्यान धावणार आहे. शुक्रवार 12 जुलै पासून बेस्ट कडून ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोस्टल रोड वर बेस्ट बस धावणार

बेस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार A78 ही बस 12 जुलै पासून धावणार आहे. त्याचं किमान तिकीट 6 रूपये आणि कमाल तिकीट 19 रूपये आहे. NCPA मधून पहिली बस सकाळी 8.50 ला सुटणार आहे तर शेवटची बस रात्री 9 वाजता असणार आहे. याप्रमाणेच भायखळा पश्चिम कडून पहिली बस सकाळी 8 आणि शेवटची 8.50 वाजता असेल. आठवडाभर ही सेवा सुरू असणार आहे. ही बस एनसीपीए-हॉटेल ट्रायडेंट-नेताजी सुभाष चंद्र मार्ग-मरिन ड्राइव्ह-कोस्टल रोड-ब्रीच कँडी हॉस्पिटल-हाजी अली-महालक्ष्मी रेसकोर्स-महालक्ष्मी स्टेशन-सात रास्ता-भायखळा स्टेशन या मार्गावर धावणार आहे.

मुंबई मध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला हा कोस्टल रोड पहिल्यांदा 11 मार्च दिवशी वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर 10 जूनला मरीन ड्राईव्ह ते वरळी मार्गिका खुली झाली. आता 11 जुलै पासून हाजी अली ते खान अब्दुल गफार खान रोड सुरू करण्यात आला आहे.