BEST Bus Fare Update: बेस्ट कडून बस पास च्या दरामध्ये कपात जाहीर; विद्यार्थी, सिनियर सिटीझन्सना मिळणार असा फायदा!

सोयीनुसार स्कीम निवडून ते डिजिटल पेमेंट करू शकाल.

BEST Bus | Twitter

बेस्ट (BEST)  कडून आता नवी आणि अधिक सुलभ बेस्ट बस पासची सेवा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ऑफिसला जाणार्‍यांसाठी स्वतंत्र फायदेशीर पास सेवा जाहीर करण्यात आली आहे. ही नवी पास ची सेवा आता एसी, नॉन एसी अशा दोन्ही बससेवांमध्ये वापरता येणार आहे. या नव्या पास मधून सेवा अधिक सुलभ करण्यासोबतच प्रवाशांची 60% पर्यंत बचत देखील केली जाणार आहे.

TOI च्या वृत्तानुसार, बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल तिकीट योजनेकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता Super Saver Plans, Student Passes, Unlimited Rides Passes आणि Senior Citizens Passes सेवा सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही प्लॅनसोबत आता प्रवासी एसी, नॉन एसी बसने फिरू शकणार आहेत. हे नवे प्लॅन आता शुक्रवार 7 एप्रिलपासून लागू केले जाणार आहेत.

पहा बेस्टचे प्लॅन्स

नव्या दरांनुसार आता अनलिमिटेड राईड पास अवघ्या 50 रूपयांमध्ये मिळणार आहे. तर महिन्याचा पास 750 रूपये आहे. सुपर सेव्हर पॅकेज मध्ये 28 दिवसांत 60 फेर्‍या करण्यासाठी 219 रूपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये प्रवासी दिवसाच्या 15 रूपयांच्या डेली पास मध्ये 4 फेर्‍या करू शकणार आहे.  सिनियर सिटीझन्सच्या सुपर सेव्हर ऑफर मध्ये 50 रूपयांची सूट मिळणार आहे. हा 28 किंवा त्यापेक्षा अधिकचा असणार आहे. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 30 दिवसांचा पास 200 रूपयांमध्ये उपलब्ध होईल ज्यामध्ये 60 ट्रीप्स असतील. नक्की वाचा: Mumbai Airport BEST Bus Services: मुंबई विमानतळ बससेवेसाठी 'बेस्ट'ने सुरु केली 'आसन आरक्षण' सेवा .

प्रवाशांना ही तिकीट दरांतील सूट BEST Chalo App वर मिळणार आहे. सोयीनुसार स्कीम निवडून ते डिजिटल पेमेंट करू शकाल.