Beed Accident: बीड-परळी महामार्गावर भरधाव कंटनरची रिक्षाला धडक; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे.

Beed Accident: बीड-परळी महामार्गावर भरधाव कंटनरची रिक्षाला धडक; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू
Accident (PC- File Photo)

बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) अशी मृत्युमुखी पडलेल्या नावे आहेत. तर रिक्षाचालक अजीम शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार हा सुरु आहे.     (हेही वाचा - Thane Elevator Accident: ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू)

बीड शहरातील अजीम शेख हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटे गव्हाण येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरवरील आपला ताबा सुटला.यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की ॲपे रिक्षाचा अक्षरशा चुराडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2023 08:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).