Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरी आंदोलनाचा भडका, शेतकरी पोलिसांमध्ये संघर्ष; तळपत्या उन्हात लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा (Barsu Refinery Protest) भडका उडाला आहे. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळतो आहे. ग्रामस्थांनी रिफायनरी सर्वेक्षणास तीव्र विरोध केला आहे. तर, दुसऱ्या बाजूला पोलीसी बळावर राज्य सरकार हा प्रकल्प रेटत असल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा (Barsu Refinery Protest) भडका उडाला आहे. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळतो आहे. ग्रामस्थांनी रिफायनरी सर्वेक्षणास तीव्र विरोध केला आहे. तर, दुसऱ्या बाजूला पोलीसी बळावर राज्य सरकार हा प्रकल्प रेटत असल्याचे चित्र आहे. या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणावर आघाडी उभारली असून तीव्र विरोध सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार सुरु केला आहे. दुसऱ्या बाजूला अश्रूधुराची नळकांडीही फोडली आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अटकसत्रही सुरु आहे. खासदार विनायक राऊत यांना अटक झाल्याचे समजे.
रणरणत्या उन्हात आंदोलन पेटले असल्यामुळे पोलिसांनाही या उन्हात आंदोलकांशी सामना करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला तीव्र उन्हामुळे काही आंदोलकांना भोवळ येऊन ते खाली कोसळत असल्याच्याही घटना घडल्या. सरकारने शेतकऱ्यांना अवाहन करत म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आम्ही चर्चेला तयार आहोत. पण त्यांनी विरोधासाठी विरोध करु नये. राज्य सरकारची विनंती शेतकऱ्यांनी धुडकावून लावली आहे. आम्हाला प्रकल्पच नको आहे तर चर्चा करुन उपयोग काय, असे शेतकरी म्हणत आहे. (हेही वाचा, MP Vinayak Raut Arrested: बारसू येथे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या 7 कार्यकर्त्यांना अटक)
राज्य सरकार रिफायनरीसाठी माती परीक्षण करण्यावर ठाम आहे. त्यासाठी राज्य सरकारने पोलीसी बळाचा वापर केला आहे. ज्याला स्थनिकांचा तिव्र विरोध आहे. सत्ताधारी वगळता विरोधी पक्षांचाही या प्रकल्पाला विरोध आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसूच्या माळराणावर गेलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी त्याब्यात घेतले असून त्यांना राजापूर येथील पोलीस स्थानकात नेल्याची माहिती आहे. याशिवाय राऊत यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तात्या सरवणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2023 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

