Baramati Lok Sabha Constituency: सुनेत्रा पवार यांच्याबद्दल Rohit Pawar यांची भूमिका जाहीर, घ्या जाणून
अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule) यांना मैदानात उतरविण्याचे संकेत दिले आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) मिळविल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule) यांना मैदानात उतरविण्याचे संकेत दिले आहेत. त्या दृष्टीने त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये आगामी काळात नणंद विरुद्ध भावजय (Sunetra vs Supriya Sule) असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यावर शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहीत पवार यांनी मात्र मोठे वक्तव्य करत रणनितीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध पवारांचीच राष्ट्रवादी असा सामना रंगला तर तो कसा असेल याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.
सुनेत्रा काकींवर टीका नाही
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सुनेत्रा काकी संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे. लोकशाही मार्गाने कोणीही निवडणूक लढवत असेल तर त्याचे स्वागतच आहे. त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण, या आधी त्या राजकारणात नव्हत्या. त्यामुळे जरी त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तर सुनेत्राकाकी यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही. मात्र, अजित पवार यांची भूमिका आणि राजकीय निर्णय यांवर मात्र आपण नेहमीच भाष्य करत राहू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Ajit Pawar यांचे सख्खे पुतणे Yugendra Pawar बारामती मध्ये दिसणार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात; आज शरद पवारांच्या कार्यालयाला भेट!)
सामना सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा असाच
शरद पवार गटाचा आंबेगाव येथे कार्यकर्ता मेळावा पार पडणार होता. या मेळाव्यास स्वत: शरद पवार उपस्थित राहणार होते. तत्पूर्वी रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बारामतीमध्ये सुप्रिया ताई विरुद्ध सुनेत्रा काकी असा सामना रंगला तरी आम्ही काकींवर काहीही बोलणार नाही. कारण यापूर्वी त्या राजकारणात नव्हत्या. आणि तसेही काकी आणि ताई यांच्यात लढत झाली तरीही तो सामना सुप्रिया ताई विरुद्ध अजित पवार असाच होणार आहे. (हेही वाचा, NCP vs NCP in Baramati: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार देणार तगडा उमेदवार, अनुभव नसला तरी दिग्गजांचा पाठींबा .)
कुटुंबात एकटं पडल्याचे चित्र अजित पवार रंगवत आहेत. पण ते चित्र केवळ स्वत:साठी आणि मलिदा गँगसाठीच आहे. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीत. राजकारणात नवखे असलेले लोकही पवार साहेबांना पाठिंबा देत 'साहेब म्हणतील तसं' असं म्हणत आहेत. आमच्यासारख्या बच्चांना हे कळतं त्यांना का कळू नये? असा टोलाही रोहित पवार यांनी अजितदादांना लगावला. दरम्यान, अजितदादा शिरुर येथून डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवार यांना उतरवू शकतात. त्यांना महायुतीमध्ये चार जागा मिळतील पण त्यांना शिरुर लोकसभा मिळमार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.