Bank Of Maharashtra Recruitment 2020: बॅंक ऑफ महाराष्ट्रात General Officer, Specialist Officer पदांवर भरती; bankofmaharashtra.in येथे करू शकता अर्ज
जनरल ऑफिसर (General Officer) आणि स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) या 2 पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रात भरती प्रक्रीया (Bank Of Maharashtra Recruitment 2020) सुरु झाली आहे. जनरल ऑफिसर (General Officer) आणि स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) या 2 पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, बॅंक ऑफ महाराष्ट्रात एकूण 550 जागांवर भरती होणार आहे. या संबंधित नुकतीच एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. या दोन्ही पदांसाठी bankofmaharashtra.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडे योग्य शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. उमेदवारांना यासंदर्भात संपूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. विविध पदांसाठी वयाची अट ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय वर्षे 18 पूर्ण असणे आवश्यक आहे. जनरल ऑफिसरचा पदांसाठी उमेदवारांकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. हे देखील वाचा- Maharashtra Police Recruitment 2020: पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई भरती अर्ज दाखल करण्यासाठी 8 जानेवारी पर्यंत मुदतवाढ; mahapariksha.gov.in करू शकता अर्ज
जागा-
जनरल ऑफिसर स्केल 2 - 200 पद
जनरल ऑफिसर स्केल 3- 300
स्पेशलिस्ट ऑफिसर- 50
अर्ज फी सर्व पदांसाठी समान ठेवण्यात आली आहे. OPEN/OBC/EWS उमेदवारांसाठी 1180 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार. तर आरक्षित उमेदवारांसाठी 118 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र येथील भरती प्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरु झाली असून 31 डिसेंबर अर्ज भरण्याची अंतिम तारिख आहे.