Riya Barde Arrested In India: बांगलादेशी ॲडल्ट स्टार रिया बर्डेला उल्हासनगरमध्ये अटक; कोण आहे आरोही उर्फ रिया बर्डे? वाचा सविस्तर

तिच्याकडे बनावट कागदपत्रांचा वापर करून बनवलेला भारतीय पासपोर्टही मिळाला आहे. अधिका-यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी बांगलादेशी पोर्न स्टार रिया बर्डेला बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी अटक केली आहे.

Rhea Barde (Photo Credit - Twitter)

Riya Barde Arrested In India: बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ ​​आरोही बर्डे (Bangladeshi Porn Star Riya Barde) हिला ठाणे पोलिसांनी (Thane Police) भारतात बेकायदेशीर वास्तव्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) केली आहे. अनेक ॲडल्ट चित्रपटांमध्ये (Adult Films) काम केलेली रिया ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये ओळख लपवून राहत होती. तिच्याकडे बनावट कागदपत्रांचा वापर करून बनवलेला भारतीय पासपोर्टही मिळाला आहे. अधिका-यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी बांगलादेशी पोर्न स्टार रिया बर्डेला बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी अटक केली आहे.

रियाच्या आईने केले भारतीय व्यक्तीशी लग्न -

पॉर्न स्टार रिया बर्डेचे नाव बन्ना शेख असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशी वंशाची रिया तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत भारतात बेकायदेशीरपणे राहत होती. रियाच्या आईने अमरावतीतील एका व्यक्तीशी लग्नही केले होते. या प्रकरणी रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

रिया राज कुंद्राच्या प्रोडक्शन कनेक्शन -

रिपोर्ट्सनुसार, रिया राज कुंद्राच्या प्रोडक्शनशी संबंधित होती. रियाने अनेक पॉर्न फिल्म्समध्येही काम केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांनी सांगितले की, तपासात असे दिसून आले आहे की रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी आहे आणि ती रिया, तिच्या दोन मुली आणि मुलासह भारतात अवैधरित्या राहत होती. रियाच्या आईने आपण पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगून अमरावती येथील अरविंद बर्डे याच्याशी लग्न केले. नंतर स्वत:ला भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिने बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर बनावट कागदपत्रे देऊन स्वत:साठी आणि मुलांसाठी भारतीय पासपोर्ट मिळवले.

यापूर्वी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात रियाला अटक -

पोलिसांनी सांगितले की, रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. रियाचे आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत आहेत, तर पोलीस तिच्या भावाचा आणि बहिणीचा शोध घेत आहेत.

मित्राने उघडकीस आणले प्रकरण -

रिया बर्डे उर्फ ​​बन्ना शेख हिचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्याने हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले. मिश्रा याने याबात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस तपासात बांगलादेशी पॉर्न स्टारचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.