BAFI Election 2021: आशिष शेलार यांचा पराभव; भारतीय बॉक्सिंग महासंघ अध्यक्ष पदावर अजय सिंग यांची निवड
या निवडणुकीत अजय सिंग ( Ajay Singh) यांनी आशिष शेलार यांचा 37 वरुद्ध 27 अशा मतांनी पराभव केला. या विजयामुले अजय सिंग यांची बीएफआय अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघ (Boxing Federation of India) अर्थातच बीएफआय (BAFI) निवडणुकीत (BAFI Election 2021) भाजप नेते, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पराभव झाला आहे. बीएफआय अध्यक्षपदासाठी निवडणूक बुधवारी (3 फेब्रुवारी) झाली. या निवडणुकीत अजय सिंग ( Ajay Singh) यांनी आशिष शेलार यांचा 37 वरुद्ध 27 अशा मतांनी पराभव केला. या विजयामुले अजय सिंग यांची बीएफआय अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीस आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (एआबीए) चे निरीक्षक उपस्थित होते. कोरोना व्हायरस संकटामळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. अन्यथा ही निवडणूक सप्टेंबर 2020 मध्येच पार पडणार होती. मधल्या काळात ही निवडणूक कोरोनाच्या कारणास्तव दोन वेळा पुढे ढकलण्यात आली.
ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग खेळाकडून भारताला नेहमी आपेक्षा असतात. अनेकदा भारतीय बॉक्सिंग खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदकासमीपही जातात. अशा या खेळावर उत्तरेकडील राज्यांचे मोठे वर्चस्व आहे. अशा स्थितीत अजय सिंह हे उत्तरेकडील लॉबिचे मन जिंकू शकले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाल्याचे मानले जात आहे. अजय सिंह यांना विजयासाठी केवळ उत्तरेकडील राज्येच नव्हे तर इशान्येकडील राज्यांचाही चांगला पाठिंबा मिळाला. त्यामुळे मुळचे उत्तराखंडचे असलेल्या अजय सिंह यांनी मुंबईच्या आशिष शेलार यांचा पराभव झाला आहे. (हेही वाचा, Pakistani Boxer Dies during Fight: बॉक्सर Mohammad Aslam याचं कराचीमध्ये निधन, 'Fight Night Series' इव्हेंट दरम्यान घडली धक्कादायक घटना)
संलग्नित 32 राज्ये आणि त्यासोबतच केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी बीएफआय निवडणुकीत मतदान करतात. दरम्यान, चार वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली होती तेव्हा बीएफआय मधील एका गटाने अजय सिंह यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे तेव्हा अजय सिंह विजयी झाले होते. तर शेलार पराभूत. या वेळी या गटाने आशिष शेलार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शेलार यांचे पारडे जड मानले जात होते. परंतू, शेवटच्या क्षणी शेलार यांना 5 मते कमी पडली. या निर्णायक मतांमुळे शेलार यांचा पराभव झाला.