Badlapur Sexual Sssault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी चर्चेत आलेल्या 'त्या' शाळेतील मुलीने सोडले घर? पीडिता छत्रपती संभाजीनगर शहरात आढळल्याची माहिती

सदर मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे दामिनी पथकाला आढळून आली.

Victim Girl

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir Badlapur) शाळेत घडलेल्या कथीत लैंगिक अत्याचाराच्या Badlapur Sexual Assault Case) घटनेनंतर महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणातील संशयित आरोपी आकाश शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यूही झाला. या मृत्यूची जोरदार चर्चा सुरु असतानाच 'या' शाळेत शिकणाऱ्या आणखी एका मुलीबद्दल कथीतरित्या धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सदर मुलीने सावत्र बापाच्या त्रासाला कंटाळून घर सोडल्याची प्राथमिक माहिती आहे. ही मुलगी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दामिनी पथकाला (Damini Squad) आढळून आली. पोलिसांनी तिची राहण्याची आणि थांबण्याची व्यवस्था केली. नंतर तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे दामिनी पथकाच्या ताब्यात

बदलापूर येथील 'त्या' शाळेत शिकणारी ही 15 वर्षांची मुलगी घरामध्ये मोबाईल स्विच ऑफ करुन कोणाला काहीही न सांगता घर सोडून गेली. रात्रीच्या रेल्वेने ती छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचली. दरम्यान, बराच काळ ती रेल्वेस्टेशनवर बसून होती. अखेर या मुलीची खबर दामिनी पथकाला मिळाली. पथकाने रेल्वेस्टेशनवर धाव घेत या मुलीला ताब्यात घेतले. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीगी सुरुवातीस काहीच बोलत नव्हती. पण, दामिनी पथक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर ती बोलती झाली. घरामध्ये सावत्र वडील त्रास देत असल्याने आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने म्हटले. सध्या ही मुलगी सुरक्षीत आहे.

पीडिता दहावी उत्तीर्ण, आईचा दुसरा विवाह

प्राप्त माहितीनुसार, पीडिता नुकतीच इयत्ता दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या आईने दुसरा विवाह केला आहे. घरामध्ये तिचे सावत्र वडिल तिला त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (25 सप्टेंबर) रात्रीच्या वेळी तिने मोबाईल बंद केला आणि घर सोडले. कोठे जायचे हे निश्चित नसल्याने ती मिळेल त्या रेल्वेत बसली. ज्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली. बराच काळ ती स्टेशनमध्ये बसून होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही मुलगी बदलापूर येथील 'त्या' शाळेतील विद्यार्थीनी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. मुलीची चौकशी सुरु असून आणखी तपशील पुढे येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भांवावर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना)

महिलांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक

महिला आणि मुलांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अत्याचार, हिंसाचार अथवा त्रासाविरोधात निशुल्क मदत मागता येते. ही मदत कायदेशीर असते. त्यासाठी कोणत्याही 181 या महिला हेल्पलाइन (WHL) क्रमांकावर फोन करणे अपेक्षीत आहे. ही एक 24 तासांची गोपनीय सेवा आहे.  करून, ईमेलद्वारे आणि ऑनलाइन चॅटिंगद्वारे उपलब्ध आहे. सर्व कॉल विनामूल्य आणि गोपनीय आहेत. ज्याद्वारे पीडित व्यक्ती पोलिसांशी संपर्क साधून मदत मागू शकते.