महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघ, कन्नड , गंगापूर, वैजापूर यांसह इतर 3 जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
विधानसभा निवडणूक 2019 निमित्ताने जाणून घेऊया औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ, गंगापूर विधानसभा मतदारसंघ, वैजापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी, उमेदवार यादी, प्रमुख लढती आणि मतदारसंघांचा राजकीय इतिहास.
Maharashtra Assembly Elections 2019: औरंगाबाद (Aurangabad) हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात येणारा एक महत्त्वाचा जिल्हा. भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्वार्थाने अतिशय लक्षवेधी. त्यामुळे विधानसभा निवडणूक लागताच या जिल्ह्यातील राजकीय लढती मोठ्या रंजक ठरतात. एकूण नऊ तालुके असलेल्या या जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कन्नड (Kannad Assembly Constituency), औरंगाबाद मध्य (Aurangabad Central Assembly Constituency), औरंगाबाद पश्चिम (Aurangabad West Assembly Constituency), औरंगाबाद पूर्व (Aurangabad East Assembly Constituency), गंगापूर (Gangapur Assembly Constituency), वैजापूर (Vaijapur Assembly Constituency) अशी या मतदारसंघाची नावे.
राष्ट्रीय काँग्रेस (National Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), शिवसेना (Shiv Sena), भाजप आणि मनसेसह (MNS) इतर सर्वच पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या हे मतदारसंघ महत्त्वाचे ठरतात. विधानसभा निवडणूक 2019 निमित्ताने जाणून घेऊया या विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी, उमेदवार यादी, प्रमुख लढती आणि मतदारसंघांचा राजकीय इतिहास.
कन्नड विधानसभा मतदारसंघ (औरंगाबाद जिल्हा)
कन्नड विधानसभा मतदारसंघ हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2009 पासून या मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे हर्षवर्धन रायभान जाधव हे निवडणून आले आहेत. मात्र, 2014 मध्ये निवडून आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर इथे पोटनिवडणूक झालीच नव्हती. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आता या जागेसाठी निवडणूक पार पडत आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघ आवश्यक माहिती | |
मतदारसंघ क्रमांक | 105 |
मतदारसंघ आरक्षण | खुला |
मतदारांची संख्या | |
पुरुष | 1,49,373 |
महिला | 1,31,072 |
एकूण | 2,80,445 |
कन्नड विधानसभा मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल | ||
उमेदवार | मिळालेली मते | राजकीय पक्ष |
हर्षवर्धन रायभान जाधव | 62,542 | शिवसेना |
उदयसिंग राजपुत | 60,981 | राष्ट्रवादी काँग्रेस |
डॉ. संजय गव्हाणे | 28,037 | भाजप |
मारूती राठोड | 5,732 | रासप |
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ (औरंगाबाद जिल्हा)
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा निवडणूक 2014 मध्ये राज्यभर चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघाच्या रुपाने असदूद्दीन ओवैसी यांच्या एमआयएएम पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत चंचू प्रवेश केला. विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे या मतदारसंघातून एमआयएमआयएम पक्षाचे उमेदवार होते. शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळवत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. सांस्कृतिकदृष्ट्या हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. या मतदारसंगात हिंदू मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच, मुस्लिम आणि इतरधर्मिय मतदारांची संख्याही इथे लक्षनिय आहे. त्यामुळे निवडणूक काळात या मतदारसंघात जातीयवादाचा प्रभाव पाहायला मिळतो. इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणुकीत निवडूण आल्यानंत त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून इथली जागा रिक्त आहे. इथे पोटनिवडणूक झाली नव्हीत. आता थेट निवडणूक पार पडते आहे.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ आवश्यक माहिती | |
मतदारसंघ क्रमांक | 107 |
मतदारसंघ आरक्षण | खुला |
मतदारांची संख्या | |
पुरुष | 1,49,911 |
महिला | 1,36,820 |
एकूण | 2,86,731 |
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल | ||
उमेदवार | मिळालेली मते | राजकीय पक्ष |
इम्तियाज सय्यद जलील | 61,843 | एमआयएमआयएम |
प्रदीप जैस्वाल | 41,861 | शिवसेना |
किशनचंद तनवाणी | 40,770 | भाजप |
संजय जगताप | 11,048 | भसपा |
विधानसभा निवडणूक 2019: औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ पक्षनिहाय उमेदवार
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार (औरंगाबाद जिल्हा)
औरंगाबाद पश्चम विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने शहरी बाज दाखवत असला तरी, त्यात आजूबाजूच्या गावांचाही समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघास निमशहरी स्पर्श पाहायला मिळतो. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये या मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या संजय शिरसाट यांनी बाजी मारली. त्यांची लढत भाजपच्या मधुकर सावंत यांच्याशी झाली. इथेही एमआयएएम पक्षाने उमेदवार दिला होता. मात्र, त्या उमेदवारास अधिक मते मिळवता आली नाहीत.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ आवश्यक माहिती | |
मतदारसंघ क्रमांक | 108 |
मतदारसंघ आरक्षण | अनुसूचित जाती |
मतदारांची संख्या | |
पुरुष | 1,54,431 |
महिला | 1,33,036 |
एकूण | 2,87,468 |
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल | ||
उमेदवार | मिळालेली मते | राजकीय पक्ष |
संजय पांडुरंग शिरसाट | 61,282 | शिवसेना |
मधुकर सावंत | 54,355 | भाजप |
गंगाधर गाडे | 35,348 | पँथर्स |
जितेंद्र देहाडे | 14,798 | काँग्रेस |
मिलिंद दाभाडे | 5,198 | राष्ट्रवादी काँग्रेस |
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ (औरंगाबाद जिल्हा)
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या काहीसा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली लोकसभा निडवणूक 2019 वगळता गेली 20 वर्षे चंद्रकांत खैरे हे इथून लोकसभेवर प्रतिनिधित्व करत होते. असे असले तरी या मतदारसंघावर शिवसेनेला आपले प्राबल्य कधीच सिद्ध करता आले नाही. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपचे अतूल सावे आणि एमआयएएम पक्षाचे अब्दुल गफार कादरी यांच्यात प्रमुख लढत झाली. त्यात भाजपच्या सावे यांनी कादरी यांचा 4 हजार 260 इतके मताधिक्य मिळवत पराभव केला. विधानसभा निवडणूक 2019 मध्येही या मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळते आहे.
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ आवश्यक माहिती | |
मतदारसंघ क्रमांक | 109 |
मतदारसंघ आरक्षण | खुला |
मतदारांची संख्या | |
पुरुष | 1,39,295 |
महिला | 1,22,460 |
एकूण | 2,61,755 |
औरंगाबाद पूर्व मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल | ||
उमेदवार | मिळालेली मते | राजकीय पक्ष |
अतुल मोरेश्वर सावे | 64,528 | भाजप |
डॉ. अब्दुल गफार कादरी | 60,268 | एमआयएमआयएम |
राजेंद्र दर्डा | 21,203 | काँग्रेस |
कला ओझा | 11,409 | शिवसेना |
कचरू सोनवणे | 5,364 | बसपा |
गंगापूर विधानसभा मतदारसंघ (औरंगाबाद जिल्हा)
गंगापूर विधानसभा मतदारसंघ म्हणजे माळी, दलित–मुस्लिम, धनगर अशा विविध जात, धर्म, पंथांच्या मतदारांचे प्राबल्य असलेला एक विविधताबहूल मतदारसंघ. या मतदारसंघावर मराठा समाजातील मतदारांचे प्राबल्य पाहायला मिळते. विधानसभा 2014 मध्ये या मतदारसंघात प्रामुख्याने भाजप-शिवसेना अशी लढत झाली. या निवडणूकीत भाजपच्या प्रशांत बंब यांनी शिवसेना पक्षाच्या अंबादास दानवे यांच्याहून अधिक मते मिळवत विजय प्राप्त केला. विधानसभा निवडणुकीत या वेळी कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.
गंगापूर विधानसभा मतदारसंघ आवश्यक माहिती | |
मतदारसंघ क्रमांक | 111 |
मतदारसंघ आरक्षण | खुला |
मतदारांची संख्या | |
पुरुष | 1,44,651 |
महिला | 1,26,386 |
एकूण | 2,71,040 |
गंगापूर मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल | ||
उमेदवार | मिळालेली मते | राजकीय पक्ष |
प्रशांत बन्सीलाल बंब | 55,483 | भाजप |
अंबादास दानवे | 38,205 | शिवसेना |
कृष्णा पाटील–डोनगावकर | 33,216 | राष्ट्रवादी काँग्रेस |
सर्जेराव चव्हाण | 14,238 | अपक्ष |
वैजापूर विधानसभा मतदारसंघ (औरंगाबाद जिल्हा)
वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार सलग 15 वर्षे निवडून येत आहे. मात्र, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का लागला. या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पृरस्कृत अपक्ष उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर निवडूण आले. अपक्ष उमेदवार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघातून भाऊसाहेब चिकटगावकर यांचा प्रचार केल्याने मोठी चर्चा झाली होती. भाऊसाहेभ चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या आर. एम. वाणी यांना पराभूत केले.
वैजापूर विधानसभा मतदारसंघ आवश्यक माहिती | |
मतदारसंघ क्रमांक | 112 |
मतदारसंघ आरक्षण | खुला |
मतदारांची संख्या | |
पुरुष | 1,44,406 |
महिला | 1,29,942 |
एकूण | 2,74,348 |
वैजापूर मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल | ||
उमेदवार | मिळालेली मते | राजकीय पक्ष |
भाऊसाहेब रामराव पाटील–चिकटगावकर | 53,114 | राष्ट्रवादी काँग्रेस |
रंगनाथ वाणी | 48,405 | शिवसेना |
डॉ. दिनेश परदेशी | 41,346 | काँग्रेस |
एकनाथ जाधव | 24,243 | भाजप |
रामहरी जाधव | 12,648 | शेकाप |
विधानसभा निवडणूक 2019: गंगापूर विधानसभा मतदारसंघ पक्षनिहाय उमेदवार
महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)