Aurangabad: वैजापुर येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापुर (Vaijapur ) येथील आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने औरंगाबाद शिवसेना (Shiv Sena) सध्या अडचणीत आहे. नात्यातील महिलेला मारहाण केल्याचा आरोप आमदार बोरनारे यांच्यावर आहे.
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापुर (Vaijapur ) येथील आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने औरंगाबाद शिवसेना (Shiv Sena) सध्या अडचणीत आहे. नात्यातील महिलेला मारहाण केल्याचा आरोप आमदार बोरनारे यांच्यावर आहे. महिलेने दिलेल्या पुरवणी जबाबावरुन विनयभंगाची कलमे लावत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला ही एका कार्यक्रमासाठी वैजापूर येथे गेली होती. या कार्यक्रमाला का गेली असे म्हणत बोरणारे यांनी सदर महिलेला मारहाण केली.
दरम्यान, आमदार बोरनारे यांच्याविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल झाली होती. मात्र, तक्रारदार महिलेने दिलेल्या पुरवणी जबाबात म्हटले की, बोरनारे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केली. या वेळी आपला विनयभंग झाल्याचा आरोपही या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी विनयभंगाची कलमे लावून गुन्हा दाखल केला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपीविरोधात आम्ही विनयभंगाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी राजकीय दबावाखाली आल्याने ओरोपीला जामीन मिळेल अशी जामीनपात्र कलमे लावली आहेत. आम्ही पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करु असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2022 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

