समलैंगिक संबंधास नकार; जोडीदारावर कोयत्याने वार

आरोपी तरुण व पीडित दोघेही समलिंगी आहेत. गेली अडीच वर्षे दोघांमध्ये हे संबंध सुरु होते. मात्र, गेल्या काही काळात दोघांमध्ये काही कारणावरुन बिनसले होते.

प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit: twitter)

एका समलिंगी जोडीदाराने दुसऱ्या जोडीदारावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील शुक्रवार पेठेतल्या सुभाषनगरमध्ये ही घटना बुधवारी सकाळी घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी तरुण व पीडित दोघेही समलिंगी आहेत. गेली अडीच वर्षे दोघांमध्ये हे संबंध सुरु होते. मात्र, गेल्या काही काळात दोघांमध्ये काही कारणावरुन बिनसले होते. त्यामुळे पीडित युवकाकडून आरोपीला हवा तो प्रतिसाद मिळत नव्हता. चिडलेल्या आरोपीने जोडीदाराच्या घरात जाऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले.

पोलिसांनी दिलेली माहती अशी, पीडित व्यक्ती नेहमीप्रमाणे त्याच्या राहत्या घरी झोपली होती. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी व्यक्ती पीडित व्यक्तीच्या घरी आला. त्याने झोपलेल्या पीडिताच्या डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार केले. यात पीडिता गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुभाषनगर येथील व्यक्तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement