Assembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे
जे नको तेच मतदारांनी नाकारले, ही प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Assembly Elections Results 2018 in Marathi: राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोरम (Mizoram) या पाच राज्यातील निकाल हाती आले असून यात भाजपला जबर धक्का बसला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या मोठ्या राज्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. यावर जे नको तेच मतदारांनी नाकारले, ही प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.
पर्याय कोण? या प्रश्नात अडकून न राहता सत्ता परिवर्तनाचे धाडस चार राज्यातील मतदारांनी दाखवले या सर्वांचे मी अभिनंदन करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे
निवडणूकीत जिंकणं-हारणं चालूच असतं. पण चार राज्यात सत्ता परिवर्तन करणाऱ्या धाडसी मतदारांचे अभिनंदन करतो. ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याहीपेक्षा पर्याय कोण?, यात गुंतून न पडता जे नको ते जनतेने नाकारले. पुढे काय ते बघात येईल. पण मतदारांच्या धाडसाचे देशाला नवी दिशा दिली आहे, असे म्हणत त्यांनी मतदारांचे अभिनंदन केले आहे.