कर्जत-जामखेड मतदारसंघ: रोहित पवार की राम शिंदे पाहा कोण आघाडीवर
राज्यभरातील 288 मतदारसंघासाठी ही मतमोजणी होत आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर विविध मतदान केंद्रांवरील मतदानाची मोजणी पार पडत आहे
Karjat Jamkhed Assembly Constituency Election Results 2019: कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) असा थेट सामना आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री तर, रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे. त्यामुळे हा मतदारसंघ हायहोल्टेज ठरला आहे. या मतदारसंघातील लढतीवर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून, काही वेळातच प्राथमिक फेरीचे निकाल हाती येण्यास सुरुवात होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजलेपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 288 मतदारसंघासाठी ही मतमोजणी होत आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर विविध मतदान केंद्रांवरील मतदानाची मोजणी पार पडत आहे. सर्वांनाच परळी विधानसभा मतदारसंघातील निकालाबाबत उत्सुकता आहे. लवकरच ही आकडेवारी आपल्या हाती येईल. (हेही वाचा, परळी: पंकजा मुंडे की धनंजय मुंडे पाहा, बहिण भावाच्या लढाईत कोण घेतंय आघाडी)
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यभरात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय. येथून मंत्री आणि भाजप उमेदवार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार असा सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवार तोडीस तोड आहे. अर्थात राम शिंदे हे मंत्री आणि या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे मैदान परिचयाचे आहे. रोहित पवार मात्र या मतदारसंघासाठी अत्यंत नवा चेहरा असून, ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यात रोहित पवार यांच्या नावामागे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे असे बिरुद चिकटल्यामुळे या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.