Ashadhi Wari Palkhi Processions 2025: 22 जून ला दिवेघाटात पालखीचा नजारा पाहण्यासाठी डोंगरांवर जाण्याला प्रशासनाचा मज्जाव
महाराष्ट्रात आषाढी एकादशीसाठी पायी वारी करत जाणं ही प्रथा 19 व्या शतकापासून चालत आली आहे. दरवर्षी या वारीत देशा-परदेशातून भाविक जोडले जातात.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आहे. 20 जून दिवशी दोन्ही पालख्या पुणे शहरामध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान पुण्यातून दिवेघाट मार्गे माऊलींची पालखी पंढरीकडे जाते. दिवेघाट हे एक अवघड वळण माऊलींची पालखी लाखो वारकर्यांसोबत पार करत असते. अशामध्ये दिवेघाट वारकर्यांनी फुललेला पाहणं हा एक अदभूत करणारा नजारा असतो. अनेक भाविक, वारकरी पालखी दिवेघाटातून जाताना डोंगरावर बसून त्याचा नजारा पाहत असते. पण यंदा प्रशासनाने दिवेघाटातून पालखी जाताना डोंगरांवर कोणालाही जाण्यास मज्जाव केला आहे. अनुचित प्रकार, अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत दगडूशेठ मंदिरात पालख्यांचा स्वागत सोहळा ते वाखरीत चिखल खेळणं वारकर्यांच्या या 6 परंपरा देतील डोळ्यांचं पारण फेडणारे अनुभव .
जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस रंजन कुमार शर्मा यांनी गुरूवार, 19 जून दिवशी परिपत्रक काढत सध्या पुण्यात वाढता पावसाचा जोर पाहता दिवेघाटात डोंगरांवर भाविकांनी जाणं टाळावं असे सूचित करण्यात आले आहे. हा प्रतिबंध 22 जुलै दिवशी रात्री 12 ते दुपारी 12 या वेळेत लागू असणार आहे.
22 जून दिवशी पुणे-सोलापूर रस्त्यावरून भैरोबा नाल्यापासून सासवडपर्यंत दिवे घाटमार्गे निघणाऱ्या पारंपारिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीत लाखो वारकरी सहभागी होतात. नक्की वाचा: Pune Traffic Update: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखींच्या पार्श्वभूमीवर पहा 22 जून दिवशी पुण्यात कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्ग कोणते.
सध्या रस्ता रुंदीकरणासाठी दिवे घाट डोंगराचे काही भाग खोदण्यात आले आहेत, ज्यामुळे घाट भाग निसरडा झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. दिवे घाट रस्त्याच्या चार किलोमीटर रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने लोकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी डोंगराच्या माथ्यावर जाणे सुरक्षित नसल्याचेही पोलिसांनी म्हटलं आहे. दिवे घाट पर्वताच्या वरच्या बाजूला अनेक लोक पर्यटनासाठी येतात, छायाचित्रे काढतात आणि रील बनवतात. पण सध्या यामधून अनेक अपघात देखील होत असल्याचे चित्र आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 12:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

