Nitin Desai Dies By Suicide: कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन

कर्जत येथील एनडी स्टुडीओत गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. गूढ मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे.

Nitin Chandrakant Desai Passes Away: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथील एनडी स्टुडीओ येथे त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृत्यूमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले, असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे. नितीन देसाई हे भारतीय कलाविश्वातील मोठे नाव आहे. त्यांनी मराठी आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी सेट उभारले आहेत. अनेक सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष जवळीक

नितीन देसाई यांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ स्थापन केला. ज्याद्वारे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी जगभरात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठीही त्यांनी अनेक वेळा सेट उभारले आहेत.

 सर जे जे कला महाविद्याल येथून प्रशिक्षण

नितीन चंद्रकांत देसाई असे पूर्ण नाव लावून ते कलाकृती सादर करत असत. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली. यात अनेक महाठी, हिंदी चित्रपटपटांचा समावेश आहे. मुंबई येथील सर जे जे कला महाविद्यालयातून त्यांनी खास प्रशिक्षण घेतले. तेथून त्यांचा कलादिग्दर्शनांतील प्रवास सुरु झाला. 'हम दिल का सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.