Arjun Kandhari: अर्जुन कंधारी यांची युवा सेनेच्या महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्यपदी नियुक्ती

श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सरचिटणीस राहुल कानल आणि अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने कोअर कमिटीची यादी जाहीर केली आहे.

Arjun Kandhari (PC - Twitter/@@RajSingh_2904)

Arjun Kandhari: अर्जुन कंधारी (Arjun Kandhari) यांची युवा सेनेच्या (Yuva Sena) महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्यपदी (Maharashtra Core Committee Member Of Yuva Sena) नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सरचिटणीस राहुल कानल आणि अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने कोअर कमिटीची यादी जाहीर केली आहे.

ही समिती तरुणांना धोरणात्मक कार्ये तयार करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भविष्यात अविभाज्य भूमिका बजावण्यासाठी कार्य करते. शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्जुन कंधारी यांची युवा सेनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. (हेही वाचा - Aaditya Thackeray यांचे विश्वासू Amey Ghole नाराजी कबूल; पक्षाची साथ सोडण्याबाबत दिली 'ही' प्रतिक्रिया)

शिवसेनेचे राहुल कनाल यांनी अर्जुन कंधारी यांचे अभिनंदन करताना सुशिक्षित तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेणे हे सकारात्मक लक्षण असल्याचे नमूद केले. त्यांनी नवशिक्षित तरुणांना राजकारणात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. (वाचा - Yuva Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पुढील टार्गेट आदित्य ठाकरे? शिंदे गटाकडून युवासेना कार्यकारणीची घोषणा)

अर्जुन कंधारी हे त्यांच्या प्रमुख रिअल इस्टेट पार्श्वभूमीसाठी ओळखले जातात. सामाजिक कार्यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. मुंबईतील अनेक सिंधी संघटनांचे ते नेतृत्व करतात.