अंकुश आरेकर यांच्या 'बोचल म्हणून' कवितेतून भाजप सरकारवर जोरदार टीका, पाहा व्हिडिओ

या मेळाव्यात अदित्य ठाकरे यांनी विकासाच्याबाबतीत भाषण केले आहे. शिवसेनेने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत खात्यावर टाकला आहे. यानंतर एका वापरकर्त्यांनी शिवसेनेच्या या व्हिडिओला रिट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

अंकुश आरेकर (Photo credit: Facebook)

शिवसेना पक्षाचे (Shiv sena) युवा नेत अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा नुकताच मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात अदित्य ठाकरे यांनी आपण स्वतः वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. शिवसेनेने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत खात्यावर अपलोड केला आहे. यानंतर एका वापरकर्त्यांनी शिवसेनेच्या या व्हिडिओला रिट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. या कवितेत कवीने भाजपच्या सरकार जोरदार टीका केली आहे. सध्या या तरुणाची कविता सोशल मीडियावर (Social Media) अधिक वेगाने व्हायरल होत आहे. या कवितेला अनेक लोकांनी पसंती दाखवली आहे. तुरीला मान्यता दिल्याबदल भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. यावर या तरुणाने त्याच्या कवितेतून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे  दुख: जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अंकुश आरेकर असे या मराठमोळ्या कवीचे नावे आहे. अंकूश हा सोलापूर जिल्हयातील मोहोळ तालुका येथील भांबेवाडी गावचा रहवासी आहे. सध्या अंकुश पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात शिकत आहे. 12 सप्टेंबरला पिंपरी-चिंचवडमध्ये गदिमांचे वारसदार म्हणून राज्यभरातील सात कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम होता यात अंकुशने 'बोचलं म्हणून...' ही कविता सादर केली होती. या कवितेचा जवळपास 5 मिनिटांचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून त्याला पसंती दर्शवली आहे. अंकुशने त्याच्या कवितेतून सध्याची परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे देखील वाचा- चंद्रयान २: इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी कवी कुमार विश्वास यांनी लिहलेली कविता नक्की वाचा

ट्वीट-

अदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून वरळी  येथील मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.