Anil Rathod Passes Away: शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे हद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

शिवसेना उपनेते आणि अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनिल राठोड (Anil Rathod) यांचे हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

Anil Rathod | Photo Credits: Twitter/ Satyajeet Tambe

शिवसेना उपनेते आणि अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनिल राठोड (Anil Rathod) यांचे हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यान 70 वर्षीय अनिल राठोड यांनी आज अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. Shivajirao Patil Nilangekar Passes Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

अनिल राठोड हे अहमदनगर शहर मतदारसंघात (Ahmednagar City Vidhan Sabha Constituency) सलग 25 वर्ष निवडून आले होते. शिवसेने कडून ते 1990 ते 2014 असे सलग 5 टर्म आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेने 2009 साली त्यांची उपनेतेपदी निवड केली होती. शिवसेना-भाजप महायुती सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देखील दिली होती. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसैनिकांसह सामान्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. खासदार अमोल कोल्हे, सत्यजित तांबे यांच्या अनेक राजकीय मान्यवरांनी त्यांना ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अमोल कोल्हे ट्विट

सत्यजित तांबे ट्वीट

अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी, कन्या, पुत्र विक्रम राठोड आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.