Andheri Fire: कामगार रुग्णालय अग्नितांडव; मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीतील मृतांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कामगार हॉस्पिटल आग (Photo Credit: ANI)

Andheri Fire: अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीतील मृतांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही आर्थिक मदत जाहीर केली आहे. अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीनंतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

रुग्णालयाला लागलेल्या आगीची दखल घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ईएसआयएस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली. मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना शक्य तितकी मदत करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. आज कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार, रोजगार खात्याचे सचिव आणि महानिरीक्षक सचिव, ईएसआयसी डिरेक्टर जनरल हे हॉस्पिटलची पाहणी करतील. त्याचबरोबर मृतांच्या, जखमींच्या नातेवाईंकांची भेट घेतील. कामगार रुग्णालयातील भीषण आग प्रकरणी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सोमवारी दुपारी 4:30 च्या सुमारास हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीने भीषण रुप धारण केले. यात 8 जण मृत्यूमुखी पडले तर 147 जण जखमी झाले.