Ancient Lord Shiv Temple Base in Nanded: नांदेडच्या Hottal गावात सापडले 11 व्या शतकातील प्राचीन शिव मंदिर व शिलालेख; पुरातत्व विभागाची मोठी कामगिरी

आता भारतीय पुरातत्व विभागाने त्यांच्या संवर्धन कार्यादरम्यान या ठिकाणी काही ऐतिहासिक मंदिरे शोधून काढली आहेत.

शिव मंदिर (संग्रहित संपादित प्रतिमा)

Ancient Lord Shiv Temple Base in Nanded: काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडले होते. जिथे मूर्ती, पादुका, नाणी अशा अनेक वस्तू आढळून आल्या. आता नांदेड (Nanded) जिल्ह्यातील होट्टल (Hottal) गावात संवर्धन कार्यादरम्यान 11 व्या शतकातील प्राचीन शिव मंदिराचा पाया सापडला आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. यासह चालुक्य काळातील मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या होट्टल येथे, संवर्धनाच्या कामात पुरातत्व विभागाला तीन शिलालेखही सापडले आहेत. साधारण 1070 च्या सुमारास इथल्या मंदिरांच्या बांधकामासाठी योगदान देणाऱ्या देणगीदारांचा यावर उल्लेख आहे. चालुक्य वंशाच्या राजांनी अकराव्या शतकात नांदेडच्या होट्टल गावात अनेक मंदिरे बांधली होती.

हा परिसर उत्तम शिल्पकलेने सजवलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध असून, येथे एकेकाळी कल्याणी चालुक्य राजांची राजधानी नांदत होती. आता भारतीय पुरातत्व विभागाने त्यांच्या संवर्धन कार्यादरम्यान या ठिकाणी काही ऐतिहासिक मंदिरे शोधून काढली आहेत. होट्टल येथील ऐतिहासिक मंदिरांच्या जतनाची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. अशाच एका मंदिरात काम करत असताना तिथल्या अतिप्राचीन शिवमंदिराच्या मूळ रचनेची माहिती झाली.

सध्या जीर्णोद्धार सुरू असलेल्या मंदिरांजवळील ढिगारा साफ करताना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने एका जुन्या मंदिराचा पाया शोधला. राज्य पुरातत्व विभागाच्या नांदेड विभागाचे प्रभारी अमोल गोटे म्हणाले की, वास्तू शोधण्यासाठी चार ठिकाणी उत्खनन करण्यात आले. या वेळी भगवान शिवाच्या पौराणिक मंदिराचा पाया सापडला. या ठिकाणी एक शिवलिंगही आढळते. यावेळी पुरातत्व विभागालाही त्या काळातील पुरेशा प्रमाणात विटा सापडल्या. यावरून मंदिराच्या बांधकामात विटांचा वापर झाल्याचे दिसून येते. (हेही वाचा: Basement Discovered In Pandharpur Vitthal Temple: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले तळघर; आढळल्या मूर्ती, पादुका, नाणी अशा अनेक वस्तू)

उत्खनन करताना शिवमंदिराच्या पायाशिवाय दोन मूर्ती आणि एक पिंडही पुरातत्व विभागाने शोधून काढले आहे. यासोबतच छोटी शिल्पे, कोरीव दगड आणि मंदिराचा अनेक भाग पुरातत्व विभागाला सापडला आहे. या ठिकाणी महादेवाची बारा ज्योतिर्लिंगे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सध्या पुरातत्व विभागाकडून होट्टल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर, रेब्बेश्वर मंदिर, परमेश्वर मंदिर आणि सोमेश्वर मंदिर या चार मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. ही चार मंदिरे दहाव्या आणि अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif