Earthquake In Maharashtra: महाराष्ट्रातील अकोल्या जिल्ह्यात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

अकोल्याच्या दक्षिणेस (South of Akola) 129 किमी अंतरावर साडेपाचच्या सुमारास हा भूंकपाचा धक्का बसला. यासंदर्भात भूकंपविज्ञान केंद्राच्या (National Centre for Seismology) हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Earthquake. (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील (Maharashtra) अकोल्या जिल्ह्यात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला आहे. अकोल्याच्या दक्षिणेस (South of Akola) 129 किमी अंतरावर साडेपाचच्या सुमारास हा भूंकपाचा धक्का बसला. यासंदर्भात भूकंपविज्ञान केंद्राच्या (National Centre for Seismology) हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दक्षिण अकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.3 रिक्टर स्केल इतकी होती. (हेही वाचा - Earthquake in Mumbai: मुंबई शहराच्या उत्तरेला 103 किमीवर 2.5 मॅग्निट्युडचा भूकंपाचा धक्का)

गेल्या आठवड्यात देशातील विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याचे घटना घडल्या आहेत. मुंबई  शहरामध्ये 17 जून रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला होता. हा भूकंपाचा धक्का 2.5 मॅग्निट्युडचा होता. याशिवाय सोमवारी ओडिशामधील रायगढ़ जिल्ह्यातील काशीपुरमध्ये सायंकाळी भूकंपचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. मागील काही दिवसात उत्तर भारतामध्ये दिल्ली, जम्मू कश्मिर प्रमाणेच गुजरात भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif