अमरावती लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: खा. आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा देतायत टक्कर; मताधिक्याची आकडेवरारी घ्या जाणून

स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्षे (जवळपास 7 टर्म) या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मताधिक्याने निवडूण येत असे. गेली दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मताधिक्याने निवडूण येत आहे. या पार्श्वभूमिवर 2019 ची निवडणूक यंदा उत्सुकतेची ठरली आहे

Navneet Rana, Anandrao Adsul | (Photo credit: facebook navneet.kaurrana.5,archived, edited and representative images only)

Amravati Lok Sabha Constituency Election Results 2019:  लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान शिवसेना (Shiv Sena) खासदार आनंदराव अडसूळ रिंगणात (Anandrao Adsul)आहेत. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)-रिपाई (RPI) युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) अशी प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

अमरावतील लोकसभेतील उमेदवार ही विकास आणि लोकाभिमुख चेहरा अशा दोन मुद्द्यांभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा लोकाभिमुख चेहरा. त्याला गेल्या पाच वर्षात मिळाळालेली केंद्रातील सत्तेची रसद आणि युतीच्या बळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचे वलय एका बाजूला. तर, पुर्वाश्रमीच्या तेलुगू अभिनेत्री आणि सत्तेला आव्हान देणारा तसेच, विकासाच्या मुद्द्यावर गर्दी खेचणारा चेहरा असलेल्या नवनीत राणा दुसऱ्या बाजूला अशी ही लढत आहे. गुणवंत देवपारे यांनीही जातीय समिकरणे आणि वंचित बहुजन मतदारांना घातलेली साद महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ रचना

अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि आमदार

विधानसभा मतदारसंघ               आमदाराचे नाव                             राजकीय पक्ष

बडनेरा                                          रवी राणा                                        अपक्ष

अमरावती                                     डॉ. सुनील देशमुख                        भाजप

तिवसा                                           अॅड. यशोमती ठाकुर                  काँग्रेस

दर्यापूर (SC)                                रमेश बुंदेले                                      अपक्ष

मेळघाट (ST)                              प्रभुदास भिलावेकर                          भाजप

अचलपूर                                       बच्चू कडू                                           अपक्ष

लोकसभा निवडणूक 2014 लढत आणि पार्श्वभूमी

Amravati Lok Sabha Constituency MP 1991 TO 2019 | (Photo credit: archived, edited and representative images only)

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने थेट लढत ही आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातच झाली होती. या निवडणुकीत अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 212 मते मिळाली होती. तर, नवनीत राणा यांना 3 लाख 29 हजार 280 मते मिळाली होती. विजेता समजली जाणारी प्रथम क्रमांकाची मते राना यांना मिळवता न आल्याने सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार म्हणून शिवसेचे आनंदराव आडसूळ यांनी विजय संपादन केला.

अमरावती हा मतदारसंघ खरं म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्षे (जवळपास 7 टर्म) या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मताधिक्याने निवडूण येत असे. गेली दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मताधिक्याने निवडूण येत आहे. या पार्श्वभूमिवर 2019 ची निवडणूक यंदा उत्सुकतेची ठरली आहे

Tags

Amravati Lok Sabha Constituency Election Results 2019 Anandrao Adsul BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Election Results Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Navneet Rana Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 अपक्ष उमेदवार अमरावती लोकसभा मतदासंघ निवडणूक निकाल आनंदराव अडसूळ कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी नवनीत राणा बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार शिवसेना शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना