Amravati City Bus Accident: अमरावती मध्ये सिटी बसचा भीषण अपघात; चौघा
मृत 9 वर्षीय मुलाचं नाव प्रितम निर्मळे आहे. बसच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
अमरावती (Amravati) मध्ये सिटी बसच्या (City Bus) एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव सिटी बसने चौघांना उडवलं आहे. या अपघातामध्ये 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर अन्य 3 जण गंभीर जखमी अवस्थेमध्ये आहेत. हा अपघात अमरावतीच्या सायन्स कौर मैदानासमोर घडला आहे. दरम्यान या अपघातानंतर जमावाने बसची मोठी तोडफोड केली आहे.
मृत 9 वर्षीय मुलाचं नाव प्रितम निर्मळे आहे. बसच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन जखमींना सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. सध्या नागरिकांचा या अपघातानंतर रोष पाहता सायन्स कोर मैदानासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. शिरसगाव कसब्यातील रहिवासी असलेल्या एक आजी आपल्या नातवंडांसोबत जात होत्या, त्यावेळी बसने त्यांना धडक दिली. नऊ वर्षाचा मुलगा बसच्या चाकाखाली आला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. नक्की वाचा: Road Accident In Udaipur: रस्त्यावरून चालणाऱ्यांना ट्रेलरने चिरडले, अपघातात 4 जणांचा मृत्यू .
राज्यामध्ये अनेक भागात मागील काही दिवसांमध्ये अंगावर शहारे आणाणार्या हिट अॅन्ड रन केसची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान अमरावती मधील सिटी बसचा अपघात कसा झाला याचा पोलिस तपास घेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 04:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

