Chipi Airport नंतर Amravati Airport वाहतूक सज्जतेस मुहूर्त?
चिपी विमानतळ या आठवड्यात उद्घाटन झाल्यावर वाहतुकीसाठी खुले होत आहे. त्यानंतर आता अनेकांचे डोळे अमरावती विमानतळाकडे लागले आहे. चिपीप्रमाणेच अमरावती विमानतळ (Amravati Airport) येत्या काही महिन्यांमध्ये वाहतुकीसाठी खुले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चिपी विमानतळ (Chipi Airport) प्रवाशांच्या सेवेत हजर होत आहे. चिपी विमानतळ या आठवड्यात उद्घाटन झाल्यावर वाहतुकीसाठी खुले होत आहे. त्यानंतर आता अनेकांचे डोळे अमरावती विमानतळाकडे लागले आहे. चिपीप्रमाणेच अमरावती विमानतळ (Amravati Airport) येत्या काही महिन्यांमध्ये वाहतुकीसाठी खुले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती हे पश्चिाम विदर्भाचे महसुली मुख्यालय आहे. त्यामुळे या विमानतळाकडेही राज्यातील जनतेचे डोळे लागले आहेत. या विमानतळाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. हे विमानतळ वाहतुकीसाठी खुले झाल्यावर राज्यातील आणखी एक शहर हवाई वाहतुकीच्या नकाशावर येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या एक वर्षभरात अमरावती विमानतळाचे काम पूर्ण करण्याचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने नियोजन झाले आहे. सर्व बाबी जर नियोजनानुसार पूर्ण झाल्या तर अमरावतीकरांचा हवाई प्रवासाचा मार्ग सूखकर होणार आहे. (हेही वाचा, Mumbai - Sindhudurg Direct Flight: 9 ऑक्टोबर पासून Alliance Air कडून मुंबई-सिंधुदुर्गदरम्यान थेट विमानसेवा; इथे पहा फ्लाईट शेड्युल, तिकिटाची किंमत)
चिपी विमानतळाचा संपूर्ण कोकणवासियांना फायदा होणार आहे. मुंबई किंवा देशाच्या इतर कानाकोपऱ्यातून कोकणात येणारे नागरिक, प्रवासी हे आजवर बसने अथवा रेल्वेने येत होते. सहाजिकच त्यात मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होत असे. आता विमान प्रवास सुरु झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शिवाय देशविदेशातून पर्यटणासाठी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनाही कोकणची मोहीणी असते. मात्र, वेळेअभावी हे प्रवासी कोकणात जाऊ शकत नव्हते. मात्र आता विमान सेवा उपलब्ध झाल्याने देश-विदेशातील प्रवाशांचे पाय आपसूकच कोकणाकडे वळतील अशी आशा आहे.
दरम्यान, राज्यातील पर्यटणास चालना देण्याचा विद्यमान सरकारचा विचार दिसतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिर्डी विमानतळ परिसरात 1600 हेक्टर परिसरात सर्व सेवायुक्त अत्याधुनिक शहर वसविण्याच्या निर्णयास मंजूरी दिली. धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर शिर्डीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच विद्यमान सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.