Amazon Responds To MNS: मनसे ठाम! अॅमेझॉन कंपनी संस्थापक जेफ बेजॉस यांनीही घेतली दखल

या ई-मेलमध्ये अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले होते. दरम्यान, अखिल चित्रे यांच्या मेलला अॅमेझॉनच्या जनसंपर्क विभागाने प्रतिसाद दिला आहे. तसेच, अॅमेझॉनकडून चित्रे यांना आलेल्या प्रतिसादाच्या मेलमध्ये म्हटले आहे की, बेजॉस यांना आपला ई-मेल प्राप्त झाला आहे.

Amazon Responds To MNS | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) करत असलेल्या मागणीची दखल आता अॅमेझॉन (Amazon) कंपनीच्या मालकानेही घेतली आहे. अॅमेझॉन अॅपमध्ये (Amazon App) असलेल्या भाषांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करणारा एक ई-मेल मनसे नते अखिल चित्रे यांनी अॅमेझोनला पाठवला होता. या मेलची दखल अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस (Jeff Bezos) यांनीही घेतली. तसेच यापुढे मराठी भाषेला अॅमेझॉनमध्ये प्राधान्य देण्याबाबत विचार केला जाईल असे म्हटले आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनकडून प्राप्त झालेल्या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअरकेली आहे. या ट्विटमध्ये चित्रे यांनी म्हटले आहे की, 'ॲमेझाॅनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत... राजसाहेब म्हणतात तसं... तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं' (हेही वाचा, MNS Appeal To CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसचे अवाहन, 'अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल')

अखिल चित्रे यांनी अॅमेझॉन कंपनीस ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले होते. दरम्यान, अखिल चित्रे यांच्या मेलला अॅमेझॉनच्या जनसंपर्क विभागाने प्रतिसाद दिला आहे. तसेच, अॅमेझॉनकडून चित्रे यांना आलेल्या प्रतिसादाच्या मेलमध्ये म्हटले आहे की, बेजॉस यांना आपला ई-मेल प्राप्त झाला आहे. अॅमेझॉनमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे आपणांस जो मनस्ताप झाला याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अॅमेझॉनच्या संबंधित विभागाला आपल्या तक्रारीबाबत कळविण्यात आले आहे. लवकरच आपल्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

दरम्यान, अॅमेझॉन कंपनीचे एक शिष्टमंडळ मुंबईत येत आहे. असे सांगतानाच चित्रे यांनी राज ठाकरे यांचा दाखला देत तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं', असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif