हापूस आंब्याचे APMC मार्केट मध्ये आगमन; डझनसाठी मोजावी लागणार 'इतकी' रक्कम

या आंब्याच्या प्रति डझन साठी 3000 रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्रात अद्याप थंडीचा जोर काही कमी झाला नसला तरी आतापासूनच सर्वांना उन्हळ्याचे वेध लागू लागले आहेत.अर्थात उन्हाच्या तीव्र झळा आणि अंगाची होणारी काहिली काही लोक मिस करत नाहीयेत मात्र उन्हाळ्यात घरोघरी आणला जाणारा आंबा कधी बाजारात येतोय याची प्रतीक्षा अधिकी दिसून येतेय. तुम्हीही हीच वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. वाशी (Vashi) येथील एपीएमसी मार्केट (APMC Market) मध्ये कोकण विभागातील हापूस आंब्यांचे नुकतेच आगमन झाले आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड (Devgad) तालुक्याच्या किनारपट्टी भागातून सर्व पुरवठा बाजारात पोहोचला आहे. या आंब्याच्या प्रति डझन साठी 3000 रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे. हेदेखील वाचा- कोकणचा राजा हापूस आंब्यांवर भौगोलिक मानांकनाची मोहर

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हापूस आंब्याचा पहिला साठा स्थानिक पातळीवर तीन हजार रुपये किंमतीला विकला जात आहे. तरीही आंब्यांची प्रख्यात प्रजातीची अद्याप निर्यात झालेली नाही किंवा हा आंबा बाजारात कधीपर्यंत येईल याची कोणतीही चर्चा अजूनही झालेली नाही. हापूस आंब्यांच्या आगमनाविषयी अधिक माहिती देताना एपीएमसीचे (वाशी) सहाय्यक सचिव सी. एम सोमकुवार सांगतात की, आठवड्यातून तीनदा कमी प्रमाणात हापूस आंबा बाजारात येत आहे तसेच चार डझन आंबे 15,000 रुपयांच्या दराने विकले गेले होते.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील आमराईचे मालक अरविंद वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार ,हंगामाची पहिली खेप 28 जानेवारीला आणि त्यानंतर दोन जानेवारी 30 आणि 2 फेब्रुवारीला एपीएमसी मार्केट, वाशी येथे पाठविली गेली होती. यंदा बदललेल्या हवामान बदलामुळे व अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला होता, त्यामुळे उत्पादन कमी व किंमत अधिक असे समीकरण बघायला मिळू शकते.